शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

ICSE 10th ,12th Results: आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर; मुंबईची जुही कजारिया देशात पहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 16:09 IST

यंदाच्या परिक्षेतही मुलींची बाजी

मुंबई: सीबीएसईपाठोपाठ आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. यातही मुलींनी बाजी मारली आहे. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत 98.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीचा निकाल 96.52 टक्के इतका लागला आहे. आज दुपारी तीन वाजता आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे निकाल जाहीर झाले. यंदा आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत किंचित सुधारणा झाली आहे. दहावीच्या निकालाच्या टक्क्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बारावीच्या निकालात 0.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या जमनाबाई नर्सी शाळेची जुही कजारिया 99.60 टक्क्यांसह देशात पहिली आली आहे. तर मुंबईचे फोरम संजनवाला आणि अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याचा यश भन्साळी देशात संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 99.40% मिळाले आहेत. नागपूरच्या चंदादेवी सराफ शाळेचा श्रीनाथ अगरवाल, गोरेगावच्या विबग्योर हायस्कूलचा झरवान श्रॉफ, जुहूच्या जमनाबाई नर्सी शाळेचा जुगल पटेल, ठाण्याच्या सिंघानिया हायस्कूलचा ओजस देशपांडे देशात तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांना 99.20 टक्के गुण मिळाले आहेत.बारावीच्या परीक्षेत कोलकात्याचा देवांग कुमार अगरवाल आणि बंगळुरुची विभा स्वामीनाथन यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. या दोघांनाही 100 टक्के गुण मिळाले आहेत. आयसीएसईच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवण्याची कामगिरी याआधी कोणालाही करता आली नव्हती. 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा