शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

गर्भवती महिलांसाठी कोरोनाची दुसरी लाट ठरली अधिक धोकादायक - ICMR स्टडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 09:32 IST

Corona Virus : पहिल्या लाटेपेक्षा गंभीर लक्षणे आणि मृत्यूची प्रकरणे देखील या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) एका स्टडीनुसार, कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम गर्भवती आणि काही दिवसांपूर्वी मुलांना जन्म देणाऱ्या महिलांवर झाला. पहिल्या लाटेपेक्षा गंभीर लक्षणे आणि मृत्यूची प्रकरणे देखील या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त असल्याचे समोर आले आहे. (icmr study pregnant postpartum women severely affected in second covid wave)

या स्टडीनुसार, गर्भवती महिला आणि मुलांना जन्म देणाऱ्या महिलांच्या प्रकरणांची तुलना पहिल्या आणि दुसर्‍या कोरोना लाटेदरम्यान करण्यात आली. यानुसार, दुसर्‍या लाटेत लक्षणे आढळण्याची प्रकरणे जास्त होती, जी 28.7 टक्के होती. तर पहिल्या लाटेमध्ये ही आकडेवारी 14.2 टक्क्यांपर्यंत होती. तसेच,  दुसर्‍या लाटेत मृत्यूचे प्रमाण 5.7 टक्के होते आणि पहिल्या कोरोनाच्या लाटेत ते फक्त 0.7 टक्के होते.

एकूण 1530 गर्भवती आणि मुलांना जन्म देणाऱ्या महिलांवर याबाबत स्टडी करण्यात आली. ज्यामध्ये 1143 पहिल्या लाटेत, तर दुसर्‍या लाटेत 387 महिलांचा समावेश होता. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत एकूण मृत्यू दर दोन टक्के होता, त्यापैकी बहुतेक कोविड निमोनिया आणि श्वास घेण्यास त्रास होणारी प्रकरणे होती.

स्टडीनुसार हे स्पष्ट झाले आहे की, या श्रेणीतील महिलांसाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. भारतात स्तनपान करणार्‍या महिलांना ही लस घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, अद्याप सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. या मुद्द्यावर नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनिजेशनमध्ये चर्चा सुरू आहे. 

याचबरोबर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकतीच शिफारस केली आहे की गर्भवती महिलांना कोविडचा धोका जास्त असल्यास आणि त्यांना इतर आजार असल्यास लसीकरण करावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPregnancyप्रेग्नंसी