शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Kulbhushan Jadhav case: आयसीजेत आज निकाल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 09:39 IST

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गुप्तहेर आणि दहशतवादीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज निकाल देणार आहे. या प्रकरणावरील सुनावणी अंतिम टप्प्यात झाली असून निकाल भारताच्या बाजूने लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गुप्तहेर आणि दहशतवादीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने  आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना  आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच, आपला निर्णय राखून ठेवला होता. आज आंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निकाल देणार आहे, या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या सुनावणीसाठी पाकिस्तानची कायदे विषयक टीम हेग येथे पोहचली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार पाकच्या कायदे विषयक टीमचे नेतृत्व ज्येष्ठ वकील मंसूर खान करत आहेत. टीमसोबत पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसलदेखील उपस्थित आहेत. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेला पाकिस्तानकडून विरोध केला जाणार आहे. 

या प्रकरणाचे 10 पॉइंट्स जाणून घ्या....1) पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गुप्तहेर आणि दहशतवादीच्या आरोपाखाली बंद कॅमेऱ्या सुनावणी केली. त्यानंतर एप्रिल 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.2) भारताने पाकिस्तानवर दबाव टाकत गुन्हा कबूल करण्यास विरोध दर्शवत त्याचवर्षी 8 मे रोजी आयसीजेमध्ये याचिका दाखल केली.3) आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानने सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांच्या मृत्यदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली.4) पाकिस्तानच्या मीडियाने दावा केला की, आंतरराष्ट्रीय न्यायालय कुलभूषण जाधव यांची शिक्षा रद्द करुन त्यांना राजनैतिक स्तरावर आदेश देऊ शकते.  5) कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय काय निर्णय घेईल, याबाबत काहीच अंदाज नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते.6) पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. 7) आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या 10 सदस्यीय खंडपीठाने 10 मे 2017 रोजी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.  8) आंतरराष्ट्रीय न्यायालयात याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात चार दिवस सुनावणी सुरु होती, यावेळी भारत आणि पाकिस्तानने आपले म्हणणे मांडले होते. 9) भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांची शिक्षा रद्द करण्याची आणि त्यांची लवकरात लवकर सुटका करण्याची विनंती केली आहे. 10) भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात सांगितले की, कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले. ज्यावेळी ते व्यापाराच्या उद्देशाने त्याठिकाणी गेले होते. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानIndiaभारतCourtन्यायालय