इचलकरंजीत वाहतूक सुरक्षा अभियान २०१५ सुरू
By Admin | Updated: January 12, 2015 14:30 IST2015-01-12T01:34:31+5:302015-01-12T14:30:41+5:30

इचलकरंजीत वाहतूक सुरक्षा अभियान २०१५ सुरू
(फोटो)
११०१२०१५-आयसीएच-०२
इचलकरंजी : येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने २६ व्या वार्षिक वाहतूक सुरक्षा अभियानाची सुरुवात प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या हस्ते करण्यात आली. आज, रविवारपासून सुरू झालेले हे अभियान २५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये शासनाच्यावतीने आलेल्या सूचनांनुसार विविध कारवाया व वाहतुकीसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.
आज, रविवारी सकाळी दहा वाजता छ.शिवाजी महाराज चौकात वाहतूक सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक एल. डी. सुरवसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांनी सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष रणजित जाधव, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, भीमानंद नलवडे, सतीश पवार, शालेय विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, रिक्षाचालक उपस्थित होते. पोलीस नाईक दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
(फोटो ओळी)
इचलकरंजीतील छ. शिवाजी पुतळा चौकात वाहतूक सुरक्षा अभियान २०१५ ची सुरुवात करताना प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व एस. चैतन्य. यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.