फक्त दोन रुपयांच्या डिस्काऊंटसाठी आईस्क्रीम विक्रेत्याची हत्या

By Admin | Updated: July 3, 2016 08:02 IST2016-07-03T08:01:40+5:302016-07-03T08:02:49+5:30

सध्याच्या जमान्यात माणसांचा स्वत:वरील आत्मसंयम मोठया प्रमाणात कमी झाला आहे. छोटया छोटया वादांचे हाणामारीत होणारे पर्यावसन आपण ट्रेन, बस प्रवासात नेहमीच पाहतो.

Ice cream vendor murdered for a discount of only two rupees | फक्त दोन रुपयांच्या डिस्काऊंटसाठी आईस्क्रीम विक्रेत्याची हत्या

फक्त दोन रुपयांच्या डिस्काऊंटसाठी आईस्क्रीम विक्रेत्याची हत्या

ऑनलाइन लोकमत 

गाझियाबाद दि. ३ - सध्याच्या जमान्यात माणसांचा स्वत:वरील आत्मसंयम मोठया प्रमाणात कमी झाला आहे. छोटया छोटया वादांचे हाणामारीत होणारे पर्यावसन आपण ट्रेन, बस प्रवासात नेहमीच पाहतो. उत्तरप्रदेश गाझियाबादमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 
 
आईस्क्रीम विक्रेत्याने फक्त दोन रुपयांचा डिस्काऊंट दिला नाही म्हणून युवकांनी आईस्क्रीम विक्रेत्याला मेरपर्यंत मारले. गाझियाबादच्या महाराजपूर गावात ही घटना घडली. या मारहाणीत आईस्क्रीम विक्रेता इस्लामचा मृत्यू झाला. राशिद त्याच्या मित्रांसह आईस्क्रीम खाण्यासाठी इस्लामच्या दुकानावर गेला. 
 
त्याने इस्लामला प्रत्येक आईस्क्रीमवर दोन रुपयांचा डिस्काऊंट देण्यास सांगितले. पण इस्लामने नकार दिला. राशिदला त्याच्या नकाराचा राग आला. यावरुन दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. शाब्दीक बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. राशिद आणि त्याच्या मित्रांनी इस्लामला जबर मारहाण केली. 
 
गंभीर जखमी झालेल्या इस्लामला जवळच्या रुग्णालयात नेले पण तेथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपी राशिदला अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. 
 
 

Web Title: Ice cream vendor murdered for a discount of only two rupees