मेहनतीच्या जोरावर अनेक जण आपलं स्वप्न पूर्ण करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. राजस्थानमधील बापी नावाच्या गावातील राम भजन कुम्हारा आणि त्यांची आई यांना कोणताच आसरा नव्हता. आव्हानात्मक परिस्थिती असूनही राम भजनने अडचणींवर मात केली आणि यूपीएससी परीक्षेत ६६७ वा रँक मिळवला.
रामचा प्रवास संघर्षमयी होता. राम त्याच्या आईसोबत रोजंदारीवर काम करायचा. दररोज दगड फोडण्याचं आणि ते घेऊन जाण्याचं काम करायचे. कठोर परिश्रम करूनही त्यांना दररोज फक्त ५ ते १० रुपये मिळायचे. जे एका जेवणासाठीही पुरेसे नव्हते. अनेकदा त्यांच्यावर उपाशी झोपण्याची वेळ आली.
रामच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. कोरोनाच्या काळ्यात त्यांची परिस्थिती आणखी खालावली. कोरोनाचा प्रसार होत असताना वडिलांना दम्याचा त्रास सुरू झाला. यानंतर वडिलांची प्रकृती आणखी बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याला आणि आईला मजूर म्हणून काम करावं लागलं.
रामच्या दृढनिश्चयामुळे आणि कठोर परिश्रमामुळे अनेक वर्षांच्या सेवेनंतर दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली. यानंतर, त्याने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न सुरू केले. आठव्या प्रयत्नात २०२२ मध्ये आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्याच्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढलं.