आयएएस रवी मृत्यूप्रकरण

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30

मृत्यूपूर्वी बॅचमेट महिलेला केले होते ४४ फोन

IAS Ravi Murdering | आयएएस रवी मृत्यूप्रकरण

आयएएस रवी मृत्यूप्रकरण

त्यूपूर्वी बॅचमेट महिलेला केले होते ४४ फोन
आत्महत्येची धमकी दिली होती
बेंगळुरु : कर्नाटकातील आयएएस अधिकार डी.के. रवी यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या तुकडीतील सहकारी महिलेला एका तासात ४४ वेळा फोन केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली असतानाच सदर महिलेनेही रवी आपल्याशी लग्न करू इच्छित होते आणि लग्न न केल्यास जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी त्यांनी दिली होती, असा खुलासा केल्याने आता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
दरम्यान राज्य सरकारने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. रवी हे एक अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या रहस्यमय मृत्यूने राज्यभरात जनआक्रोष पसरला होता. लोकसभेतही त्यांच्या मृत्यूचे पडसाद उमटले होते.
रवी यांनी ज्या महिलेला मृत्यूपूर्वी एका तासात ४४ फोन केले होते तिलाच काही एसएमएसही पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. आयएएस अधिकारी असलेली ही महिलाही विवाहित असून तिला एक अपत्य आहे. तिचे पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. २००९ साली एकाच तुकडीतील असल्याचे रवी आणि सदर महिलेची लग्नापूर्वी मैत्री होती.
रवी यांची माझ्याशी लग्न करण्याची इच्छा होती. त्यांनी सोमवारी अनेकदा मला फोन केले. मी लग्नास तयार झाली नाहीतर जीवाचे काही बरेवाईट करून घेण्याची धमकीही त्यांनी दिली होती. परंतु मी त्यांचा हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला होता, असा दावा या महिला अधिकाऱ्याने केला असल्याचे समजते.
मंड्या जिल्हा पंचायतीच्या सीईओ असलेल्या या महिलेने राज्याचे मुख्य सचिव कौशिक मुखर्जी यांना रवीचे सर्व एसएमएस, कॉल्स आणि ई मेलबाबत माहिती दिली आहे. आपण कुठल्याही चौकशीस तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.
वर्गमित्रांची निष्पक्ष चौकशीची मागणी
दरम्यान डी.के. रवी यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी आयएएस अधिकाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी केली. यासंदर्भात रवी यांच्या वर्गमित्रांकडून आम्हाला एक निवेदन मिळाले असल्याचे सेंट्रल आयएएस असोसिएशनचे सचिव आणि ज्येष्ठ आयएएस अधिकारी संजय आर. भुसरेड्डी यांनी नवी दिल्लीत सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: IAS Ravi Murdering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.