आयएएस अधिकारी संघटनेने थकविले ३४ लाख रुपये भाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 04:17 AM2019-11-11T04:17:39+5:302019-11-11T04:17:45+5:30

येथील उच्चभ्रू वस्तीतील दोन शासकीय निवासस्थानांचे थकविलेले ३४ लाख रुपयांचे भाडे भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा,

IAS officer's organization fires Rs 34 lakhs | आयएएस अधिकारी संघटनेने थकविले ३४ लाख रुपये भाडे

आयएएस अधिकारी संघटनेने थकविले ३४ लाख रुपये भाडे

Next

भोपाळ : येथील उच्चभ्रू वस्तीतील दोन शासकीय निवासस्थानांचे थकविलेले ३४ लाख रुपयांचे भाडे भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा मध्य प्रदेश सरकारने राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेला दिला आहे. यासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अजय दुबे यांनी राज्य सरकारकडे माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता. मध्यप्रदेश सरकारने राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेला भोपाळच्या चार इमली भागातील ईएन १/३, ईएन १/४ या क्रमांकाची दोन शासकीय निवासस्थाने १९९९ सालापासून वापरण्यास दिली होती.
त्यांचे ३४.५६ लाख रुपयांचे भाडे संघटनेने थकविले आहे. ते वसूल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्याने २४ आॅक्टोबरला या संघटनेला नोटीस बजावली आहे. त्यानंतर १५ दिवसांच्या आत ही थकबाकी न भरल्यास कारवाई करण्याचा इशाराही या नोटिसीत देण्यात आला आहे.
>लवकरच योग्य निर्णय घेणार
राज्यातील आयएएस अधिकाºयांच्या संघटनेचे अध्यक्ष गौरी सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्या संघटनेने शासकीय निवासस्थानांचे भाडे थकविल्याच्या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे.
या मुद्यावर आयएएस संघटनेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत लवकरच चर्चा होऊन योग्य निर्णय घेतला जाईल. गौरी सिंह हे मध्यप्रदेशच्या पंचायत व ग्रामीणविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत.
>हा तर सत्तेचा गैरवापर
यासंदर्भात अजय दुबे यांनी सांगितले की, राज्यातील आयएएस अधिकाºयांच्या संघटनेने शासकीय निवासस्थानांचे भाडे थकविणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. हाती असलेल्या सत्तेचा हा गैरवापर आहे.या प्रकरणाची मध्यप्रदेश सरकारने सखोल चौकशी करावी व दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: IAS officer's organization fires Rs 34 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.