आयएएस अधिकारी लाच घेताना अटकेत
By Admin | Updated: July 15, 2016 02:31 IST2016-07-15T02:31:37+5:302016-07-15T02:31:37+5:30
बिहारच्या कैमूर जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. जीतेंद्र गुप्ता यांना काही ट्रकचालकांकडून लाच घेताना अटक झाली असून, त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.

आयएएस अधिकारी लाच घेताना अटकेत
एस. पी. सिन्हा, पाटणा
बिहारच्या कैमूर जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. जीतेंद्र गुप्ता यांना काही ट्रकचालकांकडून लाच घेताना अटक झाली असून, त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेने डॉ. गुप्ता यांची बाजू घेत ट्रकचालकांनी त्यांना मुद्दाम अडकावले असल्याचा आरोप केला आहे.
जमशेदपूरहून पंजाबकडे निघालेले चार ट्रक कैमूर येथे अडविण्यात आले होते. ट्रकमध्ये अधिक लोह भरले असल्याचा ट्रकचालकांवर आरोप होता. ते सोडविण्यासाठी डॉ. गुप्ता यांनी ट्रकमागे ३५ हजार रुपये याप्रमाणे १ लाख ४५ लाख रुपयांची मागणी केली होती.