शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

IAS success story: महिला IAS आमदाराच्या 'प्रेमात', जाणून घ्या दिव्या एस अय्यर यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 19:57 IST

IAS Divya S Lyer and KS Sabarinathan: IAS आणि IPS हे ऐकमेकांच्या प्रेमात पडलेल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात.  

IAS Divya S Iyer Love Story । नवी दिल्ली : IAS आणि IPS हे ऐकमेकांच्या प्रेमात पडलेल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. पण एक IAS अधिकारी अशा देखील आहेत, ज्यांनी आपले हृदय कोणत्याही IAS किंवा IPS ला दिले नसून आमदाराला दिले आणि त्याच्याशी विवाह केला. खरं तर ही कहाणी केरळ कॅडरच्या IAS दिव्या एस अय्यर आणि काँग्रेस आमदार केएस सबरीनाथन यांची आहे. 2007 या कालखंडात या दोघांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी दोघेही सोशल मीडियावर सक्रिय नव्हते. तरीही त्यांनी एकमेकांशी संपर्क ठेवला आणि प्रेमकहाणी यशस्वी केली.

अशी झाली सुरूवात आमदार केएस सबरीनाधन आणि आयएएस दिव्या एस अय्यर यांची प्रेमकहाणी तिरुवनंतपुरममध्ये सुरू होते. जिथे ते पहिल्यांदाच भेटले होते. ही गोष्ट तेव्हा उघडकीस आली जेव्हा के.एस. सबरीनाथन यांनी 2007 मध्ये फेसबुकवरील रिलेशनशिप स्टेटस बदलले. यासोबतच त्यांनी लिहिले की, " जेव्हा आम्ही थोडे जवळ आलो तेव्हा आपल्याला वाटू लागले की जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन, विचार आणि आवडी-निवडी खूप समान आहेत. त्यामुळेच आम्ही घरच्यांच्या आशीर्वादाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे." 

कोण आहेत IAS दिव्या एस अय्यरIAS दिव्या एस अय्यर या केरळ केडरच्या अधिकारी आहेत. IAS अधिकारी होण्यापूर्वी त्या एमबीबीएसचे शिक्षण घेत होत्या. त्यांचे वडील इस्रोमध्ये अधिकारी होते. IAS दिव्या यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे. त्या 2014 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्या आपल्या मुलाला आपल्या मांडीवर ठेवून कार्यक्रमाला संबोधित करत होत्या.

कोण आहेत केएस सबरीनाथन केएस सबरीनाथन हे विधानसभेचे अध्यक्ष आणि दिवंगत काँग्रेस नेते जी कार्तिकेयन यांचे पुत्र आहेत. 2015 मध्ये ते आमदार झाले होते. त्यावेळी त्यांचे वय 31 वर्षे होते. त्यावेळी सर्वात तरुण आमदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. ते सध्या युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते पदवीधर असून राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी बंगळुरूमध्ये काम केले आहे. 2015 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले आणि पोटनिवडणूक जिंकली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Keralaकेरळupscकेंद्रीय लोकसेवा आयोगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टMLAआमदार