शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

स्क्वॉड्रन लीडर पत्नीने शहीद पतीला दिला हवाई दलाच्या गणवेशात निरोप, उपस्थितांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 16:37 IST

जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत हवाई दलाचे सहा सैनिक शहीद झाले होते. दरम्यान, या दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर सिद्धार्थ वशिष्ठ यांच्यावर  पूर्ण सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंदिगड - जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत हवाई दलाचे सहा सैनिक शहीद झाले होते. दरम्यान, या दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर सिद्धार्थ वशिष्ठ यांच्यावर  पूर्ण सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हवाई दलात स्क्वॉड्रन लीडर असलेली त्यांची पत्नी आरती सिंह यांनी सिद्धार्थ यांना संपूर्ण गणवेशात निरोप दिला. आपल्या पतीला अखेरची सलामी देताना आरती सिंह यांना अश्रू आवरता आले नाहीत. हे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. सिद्धार्थ वशिष्ठ आणि त्यांची पत्नी आरती सिंह हे दोघेही भारतीय हवाई दलामध्ये स्क्वॉड्रन लीडर पदावर कार्यरत होते. आरती सिंह या सुट्टी संपवून पुन्हा एकदा सीमारेषेवर जात होत्या त्यावेळीच सिद्धार्थ वशिष्ठ हे शहीद झाल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान, सिद्धार्थ यांचे पार्थिव गुरुवारी हवाई दलाच्या विमानातून चंदिगड येथे आणण्यात आले होते. सिद्धार्थ यांचे पार्थिव विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांची पत्नी आरती त्यांचे पार्थिव घेण्यासाठी हवाई दलाच्या गणवेशात तिथे पोहोचली होती. दरम्यान, सिद्धार्थ वशिष्ट यांच्यावर संपूर्ण सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ यांच्या वडिलांनी त्यांनी मुखाग्नी दिला. सिद्धार्थ वशिष्ठ यांच्या कुटुंबामध्ये सैनिकी परंपरा असून, त्यांच्या तीन पिढ्या देशसेवेमध्ये आहेत.  स्क्वॉड्रन लीडर सिद्धार्थ वशिष्ठ हे 2010 साली हवाई दलात सामील झाले होते. गेल्या वर्षी केरळमध्ये आलेल्या महापुरावेळी त्यांनी बचाव कार्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndiaभारतIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला