जैशचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत, सीमारेषेवरील हवाईतळांवर ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:22 AM2019-09-25T11:22:48+5:302019-09-25T11:23:35+5:30

पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात असलेल्या हवाई तळांवर जैश ए मोहम्मदचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

IAF bases in Srinagar, Awantipora have been put on high alert at orange level | जैशचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत, सीमारेषेवरील हवाईतळांवर ऑरेंज अलर्ट

जैशचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत, सीमारेषेवरील हवाईतळांवर ऑरेंज अलर्ट

Next

नवी दिल्ली -  पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात असलेल्या हवाई तळांवर जैश ए मोहम्मदचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. दरम्यान, या माहितीनंतर भारतीय हवाई दलाच्या  श्रीनगर, अवंतीपोरा, जम्मू, पठाणकोट, हिंडनसह सर्व मुख्य हवाई तळांवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांना सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   

जैश ए मोहम्मदचे आठ ते 10 दहशतवादी जम्मू काश्मीरमधील हवाई तळांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे, अशी माहिती सरकारमधील उच्चपदस्थ सुत्रांनी दिली. 

गुप्तचर यंत्रणांच्या इसाऱ्यानंतर हवाई दलाच्या श्रीनगर, अवंतीपोरा, जम्मू, पठाणकोट, हिंडन हवाईतळांसर सर्व मुख्य हवाई तळांवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अधिकाऱ्यांना हवाई तळावरील सुरक्षाव्यवस्थेची समीक्षा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   



  दरम्यान, कलम 370 हटवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना दहशतवाद्यांचे एक विशेष पथक पाठवण्याची तयारी जैशने केली आहे. तसेच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा एक मेजर या हल्ल्याच्या तयारीसाठी जैशला मदत करत, असल्याचे गुप्तहेर संघटनांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीममधून समोर आले आहे.

 एका परदेशी गुप्तहेर संघटनेला जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतावादी संघटनेचा दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याच्या म्होरक्या यांच्यात झालेल्या संभाषणाची गुप्त माहिती एका  परदेशी दहशतवादी संघटनेला मिळाली. त्यानंतर या गुप्तहेर संघटनेने ही माहिती भारताच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना दिली. 

Web Title: IAF bases in Srinagar, Awantipora have been put on high alert at orange level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.