बाई मी दगूड फोडतो- बाई मी दग
By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:42+5:302015-07-13T01:06:42+5:30
ूड फोडतो- विजयकुमार कोप्रे-

बाई मी दगूड फोडतो- बाई मी दग
ू फोडतो- विजयकुमार कोप्रे-मडगाव: गेली चाळीस वर्षे तो दगडावर घाव घालून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत आहेत.गोवा मुक्ती नंतर गोव्यात उज्वल भवितव्याची स्वप्ने घेऊन आलेला राजाराम स्वामी धोतरे आजही हालाखिचे जीवन जगत आहे.पाषाणी दगडा पासून पाटया-वरवंटे करण्याचे काम राजराक धोतरे व त्याचे कुटुंब गेल्या पन्नास वर्षां पासून करीत आहे.एकेकाळी गोमंतकीयांच्या किचन मधील अविभाज्य भाग असलेला मिरची वाटण्यासाठी उपयोगात येणारा'रगडा' व फातरी बनविण्याचे काम राजाराम धोतरेचे कुटुंब करीत आहे.कुंकळ्ळी देमानी येथे स्थायिक झालेले धोतरे कुटुंब आजही या पाटया-वरवंटयाच्या बनविण्याच्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत.पाटया वरवंटयाला मंदी आल्यामूळे या कारागिरानी आतां दगडी मुर्ती व लिंगे बनविण्याची कला अवगत केलेली आहे.लहान मोठया मंदिरात लिंग बनवुन देण्याचे काम धोतरे करीत आहेत.आजच्या आधुनिक जगात किचन मधून वाटया-वरवंटयाची जागा मिक्सर ग्रायंडरने घेतल्यामूळे सहाजिकच राजारामाचा व्यवसाय तोडा थंड झाला आहे पण ज्याच्या रगताच दगड फोडण्याची सवय आहे व ज्याने आपले संपूर्ण आयुष्यच दगडावर हातोडा घालण्यात काधले त्या राजारामला दुसरा उद्योगही येत नाही म्हणून आज जरी मागणी नसली तरी तेच दगड त्याच्या नशीबाचा भाग बनलेला आहे.राजाराम स्वामी धोतरे याचे संपूर्ण कुटुंब या व्यवसायात आहे.राजाराम तीन वर्षांचा असताना गोवा मुक्त झाल्यावर आपले वडिल स्वामी धोतरे याचे बोट धरून गोव्यात आला.1963 साली आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रातील कराड जिल्ह्यातून गोव्यात आला व गोव्याचाच झाला.त्यावेळी दगडी फातरी व रगडयाना चांगली मागणी होती.तीन वर्षाच्या राजारामनेही वडिलाचाच कित्ता गिरवताना आपल्या हातातही हातोडा व छिन्नी घेऊन दगडाला आकार देण्याचे काम करायला सुरवात केली.महाराष्ट्रातील कोल्हापोरातून पाशाणी दगड आणून त्या दगडाना आकार देऊन पाटया-वरवंटा बनविण्याचे काम आजही अथकपणे कुंकळ्ळीच्या देमानी येथे चालू आहे.दिवसभर काम केल्यास रोजंदारी प्राप्त होते.एक रगडा( पाटया-वरवंटा0 बनविण्यासाठी संपूर्ण कुटुंबाला तीन दिवस लागतात.एका रगडयाची किमत सद्या सहा ते सात हजार पर्यंत आहे.लहान वरवंटयाची किमत तीनशे रूपयां पर्यंत आहे.एका नगावर साधरणपणे हजाराच्या आसपास फायदा होत असल्याचे राजाराम धोतरे यांचे म्हणणे आहे.दगडाना आकार देण्यासाठी हे कलाकार आपले रक्त झिजवर असून आपले अस्तित्व टिकविण्यासाठी दहपडणा-या या कारागिराना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे.मात्र गोवा मुक्ती नंतर गोव्यात आलेल्या धोतरे कुटुंबाकडे आजही शिधा पत्रिका नाही हेच या कुटुंबाची खरी शोकांतीका आहे.ज्यांनी आपले आयुष्यच येथे गोव्याच्या मातीत काधले व ज्यानी गोव्यालाच आपली कर्मभुमी मानली त्या धोतरे कुटुंबाकडे आजही गोमंतकीय मह्णून सिध्द करण्याचे कोणतेच ओळखपत्र नाही.सरकारच्या कोणत्याच योजनाचा फायदा धोतरे कुटुंबाला मिळत नाही.त्याना केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेचा फायदा मिळत नाही.दरिद्र रेषेखाली असुनही या कुटुंबाला बीपीएलचे फायदे मिळत नाहीत.धोतरे कुटुंबातील लक्ष्मी गृह लक्ष्मी योजने पासून चारकोस लांब आहे.त्यांच्या कन्या कन्याधन योजनेसाठी पात्र नाहीत.त्यांचे आयुष्यच दगडातील त्या कणासारखे आहे जे दगडावर घण घातल्यावर दगडा पासून वेगळे होतात व अस्तित्व हीन होतात.स्वामी धोतरेची तिसरी पिढी या दगडाला आकार देण्याच्या व्यवसायात आहे.राजाराम दोतरेसह त्याची पत्नी अनुसुया धोतरे ,त्याचे दोन पुत्र.सुना व नातवंडे सर्व या व्यवसायात आहेत.आताची पिढी शाळेत जाते.चार वर्षांचा नातू विशालही हातात घण घेऊन आपल्या चिमुकल्या हातानी दगडाला आकार देन्याची कला अवगत करतो,मात्र अत्यंत हालाकीचे जीवन जगणा-या या कुटुंबाला सरकारी सहयोगाची गरज आहे.दगडातच ज्याचे जीवन गेले व ज्याने गोव्याला आपली कर्मभुमी मानली व ज्याच्या मुलांची जन्मभुमी व कर्मभुमी गोवा बनली आहे त्याना मात्र आपल्या गोमंतभुमीने स्विकारलेले नाही ही खंत राजारामाना आहे.ज्या गोमंतकाने सर्वाना आपल्या छत्रछायेत घेतले त्या गोव्यात गेली पन्नास वर्षे राहणा-या धोतरे कुटुंबाला गोमंतकीय म्हणून मान्यता मिळेल कां?हाच खरा प्रश्न आहे.(प्रतिनिधी)--------------------------------------------------------------------चौकट- कुणी रेशन कार्ड देता कां हो रेशन कार्ड-गेली पन्नास वर्षे गोव्यात असलेल्या धोतरे कुटुंबाला अजुनही रेशनकार्ड प्राप्त झालेले नाही.रेशन कार्ड नसल्यामूळे कोणत्याच सरकारी योजना या कुटुंबाला प्राप्त होत नाही.मुलाना शाळेत प्रवेश घेण्यासाठीही त्रास शन करावे लागतात.साहेब कुणी शेशन कार्ड करून द्याल कांआम्हाला अशी आर्त हाक धोतरे कुटुंब करीत आहे.------------------------------------------------------------ढँङ्म३ङ्म : 1207-टअफ-06कॅप्शन: दगडातून पाटया-वरवंटा व रगडे बनविण्यात मग्न असलेले राजाराम धोतरे त्याची पत्नी अनुसुया व नातू विशाल (छाया-विजयकुमार कोप्रे)