शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

"गो तस्कर दिसताच..."; कर्नाटकच्या मंत्र्याचा खळबळजनक इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:47 IST

"आपण जिल्ह्यात अशा प्रकारची कामे चालू देणार नाही..."

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात गाय चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यातच जिल्ह्याचे प्रभारी मंत्री मनकल एस. वैद्य यांनी, गो तस्करीत सामील असलेल्यांना रस्त्यावर अथवा चौकात गोळी घातली जाईल, असा इशारा दिला आहे. एवढेच नाही तर, आपण जिल्ह्यात अशा प्रकारची कामे चालू देणार नाही.  प्रशासन गायी आणि गोपालकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यकत ती सर्व पावले उचलत आहे, असेही ते म्हणाले. 

वैद्य यांचे हे विधान होन्नावरजवळ नुकत्याच झालेल्या एका गर्भवती गायीच्या हत्येनंतर पसरलेल्या आक्रोशानंतर आले आहे. ते म्हणाले, ‘‘गाय चोरीच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मी एसपींना (पोलीस अधीक्षक) सांगितले आहे की, हे थांबायला हवे आणि कुठल्याही किंमतीवर असे होऊ नये. हे चूक आहे. आपण गायीची पूजा करतो. आपण गाय प्रेमाने पाळतो. आपण हिचे दूध पिऊन मोठे झालो आहोत.’’

वैद्य सोमवारी पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, "आपण पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, या गुन्ह्यात जे कुणी आढळतील त्यांच्यावर कठोर करवाई करण्यात यावी. काही जणांना अटकही झाली आहे. जर अशा घटना सुरूच राहिल्या तर, मी असे म्हणणे योग्य नाही, पण अशा आरोपींना रस्त्यात अथवा चौकात गोळी घातली जाईल, असे सुनिश्चित करावे लागेल.

काम करून कमवा... -मंत्री म्हणाले, काम करा, कमवा आणि खा. आपल्या जिल्ह्यात रोजगाराचे अनेक पर्याय आहेत. मात्र आम्ही कुठल्याही परिस्थितीत गौ तस्करीत सामील असलेल्यांचे समर्थन करणारन नाही. अशा घटना यापूर्वीही झाल्या आहेत. तेव्हा भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये होता. यासंदर्भात वैद्य यांनी, सरकारला घेण्यासाठी विरोधी पक्षावर निशाना साधा. तसेच, सत्तेत असतानाही या मुद्द्यावर गप्प बसण्याचा आरोप केला.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcowगायPoliceपोलिस