अपघाताच्या मी गाडी चालवत नव्हतो - सलमान खानचा दावा
By Admin | Updated: March 27, 2015 18:31 IST2015-03-27T16:47:35+5:302015-03-27T18:31:07+5:30
हिट अँड रनप्रकरणातील सर्व आरोप अभिनेता सलमान खानने फेटाळून लावले आहेत. घटनेच्या दिवशी मी मद्यपान केले नव्हते व गाडीही चालवत नव्हतो असे सलमानने कोर्टासमोर म्हटले आहे.

अपघाताच्या मी गाडी चालवत नव्हतो - सलमान खानचा दावा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - हिट अँड रनप्रकरणातील सर्व आरोप अभिनेता सलमान खानने फेटाळून लावले आहेत. घटनेच्या दिवशी मी मद्यपान केले नव्हते व गाडीही चालवत नव्हतो असे सलमानने कोर्टासमोर म्हटले आहे. अपघातानंतर माझा ड्रायव्हर अशोक सिंह पोलिसांकडे कबुली जबाब द्यायला गेला होता पण पोलिसांनी त्याचा जबाब का नोंदवला नाही हे मला माहित नाही असे सलमानने नमूद केले आहे.
२००२ मधील हिट अँड रनप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात शुक्रवारी अभिनेता सलमान खानला कोर्टासमोर स्वतःचा बचाव करण्याची शेवटची संधी होती. सलमानने हिट अँड रन प्रकरणातील पोलिसांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. मद्यपानासाठी लिकर लायसन्स लागतो याची मला माहिती नव्हती असे सलमानने म्हटले आहे. घटनेच्या दिवशी मी गाडी चालवत नव्हतो, माझा ड्रायव्हर अशोक सिंह गाडी चालवत होता असा दावाही त्याने केला. या प्रकरणात माझ्यावतीने आणखी दोन साक्षीदार कोर्टासमोर हजर करु असे सलमानने सांगितले.
या खटल्यात आरोपीला बचावाची संधी असते. त्यानुसार आरोपी पक्षाने स्वतःचा बचाव केला असे सरकारी वकिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.