शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांचा राजकारणातून संन्यास; म्हणाले, "पराभवातून घेतला धडा" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 15:56 IST

E Sreedharan : राजकारणाला रामराम ठोकताना ई. श्रीधरन यांनी मलप्पुरममध्ये म्हटले की, मी कधीच राजकारणी नव्हतो.

केरळ : केरळच्या पलक्कड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या (BJP) तिकिटावर निवडणूक लढवणारे मेट्रोमॅन ई. श्रीधरन (Metro Man E Sreedharan) यांनी गुरुवारी राजकारणातून संन्यास घेतला. निवडणुकीतील पराभवातून मी धडा घेतला आहे, असे ई. श्रीधरन  म्हणाले. तसेच, राजकारणाला रामराम ठोकताना ई. श्रीधरन यांनी मलप्पुरममध्ये म्हटले की, मी कधीच राजकारणी नव्हतो.

देशामध्ये मेट्रोमॅन म्हणून नाव मिळवलेले ई. श्रीधरन हे भाजपाने पलक्कड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करत भाजपाने केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली होती. मात्र, त्यांना निवडणूक जिंकता आली नाही. दरम्यान, गुरुवारी त्यांनी राजकारणाला अलविदा केला आहे. 

ई. श्रीधरन म्हणाले की, माझे वय आता 90 वर्षे झाले आहे. अशा परिस्थितीत राजकारणात करिअर करणे किंवा ते पुढे चालू ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे राजकारणात राहण्याचे माझे स्वप्न नाही आहे. याचबरोबर, राजकारणातून संन्यास घेताना श्रीधरन म्हणाले की, मला माझ्या भूमीची सेवा करण्यासाठी राजकारणाची गरज नाही. मी हे आधीच तीन ट्रस्टच्या माध्यमातून करत आहे. आता माझ्यासाठी राजकारण सोडलेलेच चांगले आहे.

मेट्रो प्रकल्पांमध्ये ई. श्रीधरन यांचे मोठे योगदानदरम्यान, ई. श्रीधरन यांच्या कुशल नेतृत्वामुळे दिल्ली मेट्रोचे स्वप्न साकार झाले होते. कोकण रेल्वेसारखा अवघड प्रकल्पही ई. श्रीधरन यांच्या कौशल्यामुळे प्रत्यक्षात उतरला होता. ई. श्रीधरन यांच्या या कार्याचा गौरव भारत सरकारने पद्मविभूषण, पद्मश्रीसारखे पुरस्कार देऊन केला आहे. दिल्ली मेट्रोप्रमाणेच कोलकाला मेट्रो, कोची मेट्रोसह देशातील अनेक मोठ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये ई. श्रीधरन यांचे योगदान राहिले आहे. त्यामुळेच त्यांचा भारताचे मेट्रोमॅन म्हणून आदराने उल्लेख केला जातो.

टॅग्स :KeralaकेरळBJPभाजपाMetroमेट्रो