शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:30 IST

Satyapal Malik Passes Away:जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

Satyapal Malik Death: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. मंगळवारी दुपारी १ वाजता त्यांनी नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना ११ मे रोजी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. सत्यपाल मलिक यांनी पदावर असतानाही उघडपणे सरकारचा जोरदार विरोध केला आहे. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच सत्यपाल मलिक यांनी एक खळबळजनक  पोस्ट करत मला सत्य सांगायचे असं म्हटलं होतं. रुग्णालयात असताना सत्यपाल मलिक यांनी ७ जून रोजी एक्सवर पोस्ट केली होती. "मी गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहे आणि मला किडनीचा त्रास आहे. काल सकाळपासून मी ठीक होतो पण आज मला पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आले. माझी प्रकृती खूप गंभीर होत चालली आहे. मी जिवंत असलो किंवा नसलो तरी माझ्या देशवासियांना मला सत्य सांगायचे आहे," असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं.

"मी राज्यपाल पदावर असताना मला १५०-१५० कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती, पण मी माझे राजकीय गुरू, शेतकरी मसीहा दिवंगत चौधरी चरण सिंह जी यांच्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहिलो. मी राज्यपाल असताना शेतकरी आंदोलनही सुरू होते. कोणत्याही राजकीय लोभाशिवाय मी पदावर असताना शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. त्यानंतर महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनात जंतरमंतर ते इंडिया गेट पर्यंतच्या प्रत्येक लढतीत मी त्यांच्यासोबत होतो. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सैनिकांचा मुद्दा उपस्थित केला आला होता, ज्याची चौकशी या सरकारने आजपर्यंत केलेली नाही. सरकार मला सीबीआयला धमकी देऊन खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी निमित्त शोधत होती. ज्या निविदेच्या प्रकरणामध्ये त्यांना मला अडकवायचे होतो ती मी स्वतः रद्द केली होती. मी स्वतः पंतप्रधानांना सांगितले होते की या प्रकरणात भ्रष्टाचार झालाय. त्यांना सांगितल्यानंतर मी स्वतः निविदा रद्द केली. माझ्या पदावरुन हटवल्यानंतर या निविदेवर दुसऱ्याच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या," असंही सत्यपाल मलिक म्हणाले.

"मला सरकार आणि सरकारी संस्थांना सांगायचे आहे की मी शेतकरी समुदायाचा आहे, मी घाबरणार नाही आणि झुकणार नाही. सरकारने माझी बदनामी करण्यासाठी पूर्ण ताकद लावली. मी सरकार आणि त्यांच्या यंत्रणांना विनंती करतो की त्यांनी माझ्या देशातील लोकांना तपासादरम्यान काय आढळले ते जरा सांगावं.  सत्य हे आहे की ५० वर्षांहून अधिक काळाच्या राजकीय कारकिर्दीत उच्च पदांवर देशाची सेवा करण्याची संधी असूनही, मी अजूनही एका खोलीच्या घरात राहतो आणि कर्जातही बुडालो आहे. जर आज माझ्याकडे पैसे असते तर मी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असते," अशी खदखद सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केली होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाDeathमृत्यू