सीबीआय चौकशीला मी तयार एकनाथराव खडसे : लाच प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
By Admin | Updated: May 16, 2016 00:38 IST2016-05-16T00:38:09+5:302016-05-16T00:38:09+5:30
जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय? त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारे चौकशी करावी. या प्रकरणाची आपल्याला देखील उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सीबीआय चौकशीला मी तयार एकनाथराव खडसे : लाच प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
ज गाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय? त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारे चौकशी करावी. या प्रकरणाची आपल्याला देखील उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्णपणे छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.तत्कालिन मंत्र्यांनी जमीन नाकारलीखडसे म्हणाले, तक्रारदार डॉ.रमेश जाधव यांनी २००८ व २००९ मध्ये जमिनीच्या मागणीसाठी शासनाकडे अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळला होता. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी तत्कालिन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पिटीशन अर्ज केला. त्यांनी सवार्ेच्च न्यायालयाचा दाखला देत जमीन देण्यास नकार दिला. तसेच २०१४ मध्ये ही जमिन परिवहन खात्याला देण्याबाबत आदेश दिले. त्या आशयाचे आदेश जिल्हाधिकार्यांनी देत ती जागा परिवहन खात्याकडे वर्ग केली. २५ फेब्रुवारी रोजी आपण जमीन नाकारलीदरम्यानच्या काळात डॉ.जाधव यांनी आपल्याकडे रिव्ह्यू पिटीशन दाखल केली. त्यात मागील मंत्री, अधिकारी यांनी संगनमत करीत जमीन नाकारल्याचा आरोप केला. महसूल मंत्री म्हणून आपल्याला अर्ध न्यायीकचा दर्जा आहे. ही जमीन गायराणाची आहे. जमीा आर.टी.ओ.खात्याकडे वर्ग केली आहे. तसेच परिवहन विभागाने या जमिनीची ५ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे भरणा केली असल्याने २५ फेब्रुवारी रोजी जमीन देता येत नसल्याचा निर्णय आपण दिला. हा निर्णय ठाणे जिल्हाधिकार्यांनी तक्रारदार यांना कळविला. त्यानंतर एप्रिल महिन्यात तक्रारदार यांनी लाचची मागणी केल्याचा आरोप केला.तक्रारदार हा विकृततक्रारदार याने सुरुवातीला १५ कोटींच्या लाचची मागणीचा आरोप केला. नंतर ३० कोटी मागितल्याचा आरोप केला. रेडीरेकनरच्या दरानुसार ज्या जमिनीची किंमत ५ कोटी आहे. त्यासाठी ३० कोटींची मागणी होईल कशी असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. तक्रारदाराने केलेले आरोप व पूर्व इतिहास पाहता तो विकृत असल्याचे लक्षात येते, असेही खडसेम्हणाले.एक कोटीवर किती शून्य हे गजाननला माहित नाहीगजानन उर्फ गजमल पाटील हा मतदार संघातील व्यक्ती आहे. वारकरी असल्यामुळे आपल्यासोबत तो आषाढीच्या वारीमध्ये अनेकदा आला आहे. त्याची ओळख नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. गजानन याला एक कोटीवर किती शून्य आहे हे विचारल्यास सांगता येणार नाही.