शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

विशेष लेख: माेनालिसा, सैफ असे राेज काेणीतरी हवेच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:35 IST

कुंभमेळ्यात एक तरुणी माळा विकत होती. मेहनती होती. बऱ्यापैकी व्यवसाय होत होता. कोणीतरी तिचा फोटो काढला. सोशल मीडियावर व्हायरल केला. लाइक्सचा खच पडला. तिच्या वडिलांनी शेवटी तिला आपल्या गावी पाठवून दिले.

निळू दामले  , मुक्त पत्रकार|

सैफ अली खानवर हल्ला झाला. सोशल मीडियावर मजकूर पडू लागला. आपल्यावर नेमका कसा हल्ला झाला हे सैफलाही कळलं नव्हतं; पण या लोकांना ते माहीत होतं. हल्ला करणारा कोणत्या धर्माचा होता, त्याचा हेतू काय होता,  तो आता कुठे पळालाय हे सारं सोशल मीडियाला माहीत होतं. हल्ला करणाऱ्यानंही कुठं जायचं ठरवलं नव्हतं; पण सोशल मीडिया २४ तास ॲक्टिव्ह असणाऱ्या माणसांना ते माहीत होतं. पोलिसांना तपासात जे जे सापडत नव्हतं ते ते सारं यांच्याजवळ होतं. या लोकांचे पत्ते गोळा करावेत. त्यांच्या हाती पोलिस खातं सोपवावं. कोर्टंही त्यांच्याच हाती सोपवावी. त्यांना जर थोडी अधिक संधी दिली तर ते गुन्हा व्हायच्या आधीच  गुन्हेगाराचा शोध लावून, खटला चालवून, शिक्षा करून मोकळे होतील. 

कुंभमेळ्यात एक तरुणी माळा विकत होती. मेहनती होती. बऱ्यापैकी व्यवसाय होत होता. मोनालिसा भोसले तिचे नाव. हेदेखील आम्हाला सोशल मीडियातून कळाले. उत्साही मोबाइल कॅमेरावाले तिथं पोहोचले. त्यांनी फोटो वेगवेगळ्या सोशल मीडियावर टाकले. ते फोटो व्हायरल झाले. हां हां म्हणता एक लाख लाइक्स, आणखी एक लाख लाइक्स, एक लाख शेअर.  

तिच्याभोवती फोटो घेणाऱ्यांचा, तिच्याशी बोलणाऱ्यांचा गराडा. आपल्यापेक्षा पॉप्युलर होणारी ही कोण असा राजकारण्यांनाही प्रश्न पडला. पण तोवर ती मुलगीच वैतागली होती.  सभोवतालच्या गराड्यामुळं तिचा व्यवसाय बसला, कोणी गिऱ्हाईक येईनात. तिच्या वडिलांनी शेवटी तिला दुःखी होऊन आपल्या गावी पाठवून दिले.

गांधीजी म्हणत की त्यांचं आयुष्य हे उघड्या पुस्तकासारखं आहे, आपण काहीही लपवून ठेवलेलं नाही.गांधीजींचा आदर्श लोकांनी ठेवलाय. फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲपवर लोक आपलं आयुष्य टाकतात. मुलाचा सातवा वाढदिवस. आज घरात मिसळ कशी केलीय. आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस. 

लग्नाचा वाढदिवस असं सांगताना पत्नीच्या खांद्यावर किंवा कंबरेमागं हात घालून काढलेला फोटो. सकाळपासून सर्दी खोकल्याचा कसा त्रास सुरू झालाय. डिप्रेशन आलंय. वगैरे. पुढाऱ्याचा जसा मिनिटवार कार्यक्रम असतो तशी कार्यक्रम पत्रिका. निवडणूक होते. निकाल पूर्णपणे लागलेला नसतो. 

फेसबुकवर कोण मुख्यमंत्री होणार, कोणाकडं कोणतं खातं येणार इत्यादी इत्थंभूत माहिती येते. ज्यांची नावं मुख्यमंत्रिपदासाठी वा मंत्रिपदासाठी येतात त्यांची संख्या काही हजार होते. सरकार ही एक रोजगार योजना आहे की काय असं वाटावं इतके मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या संख्येवरून वाटावं.  ती ती माणसं नावं वाचून काही काळ हवेत तरंगत असतील. सोशल मीडियात थोडा वेळ खर्च करा. भारत आता १०० टक्के साक्षर आणि  सुजाण झालाय हे कळतं.  

लोक सोशल मीडियातून ज्ञान गोळा करतात, त्यावर आपल्या विचारशक्तीचा संस्कार करून ते ज्ञान पुन्हा लाखो लोकांना सोशल मीडियातून देतात. जगातल्या प्रत्येक गोष्टींचं खडान् खडा ज्ञान त्यांच्याजवळ असतं. झोपेतला, आंघोळ करताना आणि संडासातला वेळ वगळता बाकीचा सर्व वेळ ते ज्ञान प्रसारासाठी वापरत असतात. शाळा, कॉलेज, शिक्षण खातं, प्रयोगशाळा, संशोधन संस्था इत्यादी गोष्टींची आता आवश्यकताच राहिलेली नाहीये हेही सोशल मीडियातल्या व्यवहारातून लक्षात येतंय. भारताची ही प्रगती पाहून ऊर भरून येतो.

टॅग्स :Saif Ali Khanसैफ अली खान Kumbh Melaकुंभ मेळा