माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार

By Admin | Updated: January 8, 2017 20:19 IST2017-01-08T17:19:58+5:302017-01-08T20:19:37+5:30

आता सर्व काही अखिलेशकडे आहे, माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार असल्याची खंत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी व्यक्त केली आहे.

I just have to count the MLA | माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार

माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - आता सर्व काही अखिलेशकडे आहे, माझ्याकडे फक्त मोजण्यापुरतेच आमदार असल्याची खंत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी व्यक्त केली आहे. समाजवादी पार्टीच्या चिन्हावरून पिता-पुत्रांमध्ये जुगलबंदी रंगली असतानाच आज मुलायम सिंह यादव यांनी दिल्ली गाठली. दिल्लीत त्यांनी शिवपाल यादव आणि अमर सिह यांच्यासोबत बैठक केली.

याचदरम्यान बाहेर घोषणाबाजी करणा-या कार्यकर्त्यांना बोलावून सांगितले की, अखिलेश हा माझाच मुलगा आहे. त्याला जे करायचं आहे ते करू दे, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू. यावेळी मुलायम सिंहांनी अखिलेश विरोधात बोलण्याचं टाळलं आहे. उत्तर प्रदेशात रस्त्यांचा विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवपाल यादव यांचं मोठं योगदान असल्याचंही त्यांनी सांगितलं. निवडणुकांची तारीख जाहीर होऊन 4 दिवस झाले असून, वेळ अजिबात नाही. आता काहीच होऊ शकत नाही. तुम्ही निवडणुकीची तयारी करा, घोषणा केलेल्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी कामाला लागा, असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पक्षचिन्हावर दावा ठोकण्यासाठी मुलायम सिंह सोमवारी निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत. तत्पूर्वी रामगोपाल यादव यांनी समाजवादी पार्टीच्या 90 टक्क्यांहून अधिक नेते आणि कार्यकर्ते अखिलेशच्या बाजूने आहेत. निवडणूक आयोगानं 9 जानेवारीपर्यंत कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. अखिलेश यांनी याआधीच आवश्यक कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे जमा केली आहेत.

Web Title: I just have to count the MLA