शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मला आशा आहे की देशातील जनता भाजपाचा दारुण पराभव करेल - अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 16:35 IST

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी देशातील विरोधक एकजुट दाखवत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी देशातील विरोधक एकजुट दाखवत आहेत. बिहारमधील पाटणा येथे झालेल्या बैठकीनंतर आज आणि उद्या बंगळुरू येथे विरोधकांची बैठक होत आहे. प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन भाजपाला रोखण्यासाठी कॉंग्रेस पावले टाकत आहे. कॉंग्रेससह २४ पक्षांचे नेते या बैठकीला हजेरी लावणार आहेत. ज्या उत्तर प्रदेशातून देशाच्या सत्तेचा मार्ग ठरतो, त्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. 

कॉपी करणारी लोक कधीच पास होत नाहीत, असा उपरोधिक टोला अखिलेश यांनी लगावला. "पाटणा नंतर बंगळुरू येथे बैठक होत आहे याचा मला आनंद आहे. देशातील दोन तृतीयांश जनता भाजपाला पराभूत करणार असून, मला आशा आहे की जनता भाजपाचा दारुण पराभव करेल. मी कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन करेन कारण त्यांनी भाजपाला पराभूत केले. मला सर्व कानाकोपऱ्यातून माहिती मिळत आहेत. देशातून भाजपाचा नायनाट होईल. जे लोक कॉपी करतात त्यांना कधीच यश मिळत नाही. विरोधकांची बैठक होत आहे अशी माहिती मिळताच त्यांनी आपली बैठक बोलावली आहे", अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष आपापली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एनडीएची नवी दिल्लीत बैठक होत आहे, तर बंगळुरूत सोमवारी आणि मंगळवारी २४ विरोधी पक्ष बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. 

एनडीएमध्ये सध्या कोण?सत्तेत असलेल्या एनडीएमध्ये सध्या २४ पक्ष आहेत. यात भाजप, अण्णाद्रमुक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, नॅशनल पीपल्स पार्टी, एनडीपीपी, एसकेएम, जेजेपी, आयएमकेएमके, एजेएसयू, आरपीआय, मिझो नॅशनल फ्रंट, टीएमसी, आयपीएफटी (त्रिपुरा), बोडो पीपल्स पार्टी, पीएमके, एमजीपी, अपना दल, आसाम गण परिषद, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी, निषाद पार्टी, यूपीपीएल, एआयआरएनसी, शिरोमणी अकाली दल संयुक्त (ढींढसा) आणि जनसेना (पवन कल्याण) यांचा समावेश आहे.   

टॅग्स :Karnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा