शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"मी प्राध्यापकांच्या घरात २० मिनिटे लपून राहिले"; PMO कार्यालयाने मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 07:59 IST

पंतप्रधान कार्यालयाने या घटनेबाबत अहवाल मागविला आहे

वाराणसी (उत्तर प्रदेश) : बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) आयआयटीच्या विद्यार्थिनीचा कथित विनयभंग आणि तिला विवस्त्र करून व्हिडीओ बनविल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळपासून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन रात्री उशिरा संपले. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने या घटनेबाबत अहवाल मागविला आहे. पीडित विद्यार्थिनीने नोंदवलेल्या एफआयआरचा तपशीलही समोर आला आहे.

आयआयटीच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही विद्यार्थी आंदोलन थांबविण्यास तयार नव्हते. रात्री उशिरा आयआयटीचे संचालक व पोलिस प्रशासनासोबतच्या दीर्घ बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले. दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन विद्यापीठाने दिले आहे.

एफआयआरमध्ये काय?त्यांनी माझे तोंड घट्ट बंद केले आणि मला एका कोपऱ्यात नेले, जबरदस्तीने माझे चुंबन घेतले, कपडे काढले आणि फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले. मी मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली. १०-१५ मिनिटांनी त्यांनी मला सोडले. मी माझ्या हॉस्टेलच्या दिशेने धावले तेव्हा मला मोटरसायकलचा आवाज आला. त्यानंतर मी एका प्राध्यापकांच्या घरात २० मिनिटे लपून राहिले. त्यानंतर प्राध्यापकांनी मला सुरक्षा अधिकाऱ्यांकडे नेले.

टॅग्स :universityविद्यापीठUttar Pradeshउत्तर प्रदेश