‘मला विधिमंडळात प्रवेश नाकारला’

By Admin | Updated: August 3, 2016 05:13 IST2016-08-03T05:13:31+5:302016-08-03T05:13:31+5:30

स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर महाराष्ट्र विधिमंडळात सुरू असलेली चर्चा मला बघायची होती.

'I have denied access to the legislature' | ‘मला विधिमंडळात प्रवेश नाकारला’

‘मला विधिमंडळात प्रवेश नाकारला’

नवी दिल्ली : स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर महाराष्ट्र विधिमंडळात सुरू असलेली चर्चा मला बघायची होती. परंतु माझ्याकडे प्रवेशाचा अधिकृत पास असूनही मला तेथे प्रवेश नाकारण्यात आला, असा दावा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने मंगळवारी येथे केला. तो जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा नेता आहे.
विदर्भ मुद्द्यावरील चर्चा बघायची होती व दुपारी १२ ते १ अशी वेळही दिली गेली होती. मी १२.२० वाजता पोहोचूनही सुरक्षारक्षकांनी वेळ वाया घालवून मला सभागृहात ठरावीक वेळेत प्रवेश दिला नाही, असे कन्हैया कुमारने वार्ताहरांशी बोलताना सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'I have denied access to the legislature'