राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला - रॉबर्ट वाड्रा

By Admin | Updated: June 30, 2016 13:05 IST2016-06-30T13:05:38+5:302016-06-30T13:05:38+5:30

राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला. सरकार माझ्या विरोधात काहीही सिद्ध करु शकत नाही असा दावा रॉबर्ट वाड्रा यांनी केला आहे.

I have always been used for political gain - Robert Vadra | राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला - रॉबर्ट वाड्रा

राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला - रॉबर्ट वाड्रा

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३० - राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला. सरकार माझ्या विरोधात काहीही सिद्ध करु शकत नाही असा दावा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्टमधून केला आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्यावर विविध जमिन घोटाळयाचे आरोप आहेत. त्याची चौकशी सुरु आहे. 
 
पुराव्याशिवाय ते काहीही सिद्ध करु शकत नाहीत. दशकभरापासून माझ्यावर खोटे आणि तथ्यहीन आरोप होत आहेत असे वड्रा यांनी म्हटले आहे. हरयाणामध्ये झालेल्या जमिन व्यवहारांच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती एस.एन.धिंग्रा आयोगाची स्थापना झाल्यानंतर लगेचच वड्रा यांनी एफबी पोस्टवरुन आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. 
 
बांधकाम क्षेत्रातील डीएलएफ आणि वड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटलिटीमध्ये झालेल्या जमिन व्यवहारांचीही चौकशी होणार आहे. राजकीय फायद्यासाठी नेहमीच माझा वापर झाला हे मला ठाऊक आहे. पण माझी बाजू सत्याची आहे. 
 
त्यामुळे मी ताठ मानेनेच चालणार. माझ्या बद्दल जे चुकीचे समज करुन देण्यात आले आहे ते दूर होतील अशा विश्वास वड्रा यांनी त्यांच्या फेसबुकमध्ये पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. न्यायमूर्ती धिंग्रा आयोगाने आतापर्यंत २५० फाईल्सची पडताळणी केली आहे. 
 

Web Title: I have always been used for political gain - Robert Vadra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.