शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

माझ्या नावावर घर नाही; पण लाखो मुलींना घरमालक बनवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 09:40 IST

पंतप्रधान मोदी : गुजरातमध्ये ५,००० कोटींच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ; रोबोटने पंतप्रधानांना दिला चहा...

बोडेली (गुजरात) : आपल्या नावावर घर नाही; पण आमच्या सरकारने देशातील लाखो मुलींना घरमालक बनवले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर मंगळवारी पोहोचले.

राज्यातील आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली शहरात शिक्षण क्षेत्राशी संबंधित ४,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांसह ५,००० कोटींहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी ते लोकांना संबोधित करत होते. ते म्हणाले की, मला गरीब लोकांच्या समस्या माहीत आहेत आणि मी नेहमीच त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आज मी समाधानी आहे. कारण माझ्या सरकारने देशभरातील लोकांसाठी चार कोटी घरे बांधली आहेत. आदिवासी, अनुसूचित जाती आणि मागास समाजातील कोट्यवधी महिला आता लखपती झाल्या आहेत. कारण त्यांच्याकडे सरकारी योजनांतर्गत उभारलेली घरे आहेत.

जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा हे गांधीनगर येथील गुजरात शिक्षण विभागाच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरने इतके प्रभावित झाले की, त्यांनी देशभरात अशी केंद्रे सुरू करण्याचा आग्रह केला असल्याचेही मोदींनी सांगितले. कोणाचेही नाव न घेता मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल करत ते आरक्षणाचे राजकारण करत असल्याचे सांगितले. 

२० वर्षांपूर्वी त्यांनी ‘व्हायब्रंट गुजरात’चे बीज पेरले होते आणि आज ते मोठे झाड झाले आहे. २०१४ मध्ये जेव्हा माझ्याकडे देशाची सूत्रे सोपवण्यात आली, तेव्हा भारताला जागतिक विकासाचे इंजिन बनवणे हे माझे ध्येय होते. आतापासून काही वर्षांत, तुमच्या डोळ्यांसमोर भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल, ही माझी हमी आहे.    - पंतप्रधान मोदी 

भारत लवकरच जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल : पंतप्रधान भारताला जागतिक विकासाचे इंजिन बनवणे हे आपले ध्येय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. देश लवकरच जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल, असा दावाही त्यांनी केला.

गुजरातमधील भाजप सरकारने अंबाजी ते उमरगामपर्यंतच्या संपूर्ण आदिवासी भागात पाच वैद्यकीय महाविद्यालये, दोन विद्यापीठे आणि २५ हजार नवीन वर्गखोल्या तयार केल्या आहेत, असे मोदी म्हणाले.

महिला आरक्षण विधेयक विरोधक तीन दशकांपासून रोखले n विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयक तीन दशकांपासून रोखून धरले आणि विधेयक मंजूर झाले असताना ते जात आणि धर्माच्या आधारावर महिलांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला. n भाजपने बडोदा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. नवलाखी मैदानावर हजारो महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWomenमहिलाHomeसुंदर गृहनियोजन