शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Agneepath Agneeveer Protest: “इतक्या विरोधाला सामोरं जावं लागेल असं वाटलं नव्हतं,” अग्निपथ विरोधावर नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 21:06 IST

केंद्र सरकारने देशाच्या तिन्ही दलांसाठी सुरू केलेल्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक भागांतून तीव्र विरोध होत आहे. यावर नौदल प्रमुखांनी भाष्य केले आहे.

केंद्र सरकारने देशाच्या तिन्ही दलांसाठी सुरू केलेल्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक भागांतून तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारीही बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये निदर्शने आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या. अग्निपथ योजनेच्या विरोधात नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. या योजनेवर इतक्या व्यापक हिंसक विरोधाची अपेक्षा नव्हती, असे नौदल प्रमुख म्हणाले.

“मला अशाप्रकारच्या विरोधाची अपेक्षा नव्हती. आम्ही अग्निपथ योजनेवर जवळपास दीड वर्षे काम केले. भारतीय लष्करातील मानव संसाधन व्यवस्थापनातील हे सर्वात मोठे परिवर्तन आहे. योजनेची चुकीची माहिती आणि गैरसमजामुळे याचा विरोध होत आहे,” असं आर हरी कुमार म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. ही योजना मागे घेण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे.

योजना समजून घेणं गरजेचं“मी लोकांना सांगू इच्छितो याला विरोध करू नका आणि हिंसक होऊ नका. त्यांनी ही योजना काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि शांत राहिलं पाहिजे. तरूणांना देशसेवा करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.काय आहे योजना?मोदी सरकारने पुढील दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली होती. यानुसार तरुणांना देशसेवेची संधी मिळणार आहे. सैन्यात चार वर्षे नोकरी केल्यानंतर या तरुणांना सेवा निधी देखील दिला जाणार आहे. 

तरुणांची सैन्यात चार वर्षांसाठी भरती केली जाणार. हे जवान नाही तर अग्नीवीर संबोधले जाणार. या दरम्यान अग्निवीरांना आकर्षक पगार मिळेल. चार वर्षांच्या सैन्य सेवेनंतर तरुणांना भविष्यासाठी अधिक संधी दिली जाणार आहे. सेवा निधी पॅकेज चार वर्षांच्या सेवेनंतर उपलब्ध होईल. या योजनेंतर्गत भरती झालेल्या बहुतांश सैनिकांना चार वर्षांनी मुक्त केले जाईल. मात्र, काही जवान आपली नोकरी सुरू ठेवू शकतील. १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना संधी मिळेल. प्रशिक्षण १० आठवडे ते ६ महिन्यांचे असेल. या अग्नीवीरसाठी १०/१२ वीचे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.

संरक्षण मंत्रालयानुसार अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात आलेल्या तरुणांना पहिल्या वर्षी ४.७६ लाखांचे पॅकेज मिळेल. चौथ्या वर्षी हे पॅकेज ६.९२ लाखांवर जाईल. याशिवाय अन्य रिस्क आणि हार्डशिप भत्ते देखील दिले जातील. चार वर्षांनंतर सैन्य दल सोडावे लागणाऱ्या अग्निवीरांना ११.७ लाख रुपए सेवा निधी दिला जाईल, यावर कोणताही कर लावला जाणार नाही. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndiaभारतindian navyभारतीय नौदल