शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून केली राफेल विमानाची पूजा, राजनाथ सिंह यांनी सांगितले कारण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 08:13 IST

विजयादशमीदिवशी फ्रान्सकडून राफेल विमान ताब्यात घेताना केलेल्या पूजनामुळे निर्माण झालेल्या वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली - विजयादशमीदिवशी फ्रान्सकडून राफेल विमान ताब्यात घेताना केलेल्या पूजनामुळे निर्माण झालेल्या वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ''मला जे योग्य वाटले तेच मी केले. या विश्वात एक महाशक्ती आहे अशी आमची श्रद्धा आहे. तसेच माझासुद्धा लहानपणासून या गोष्टीवर विश्वास आहे, असे राजनाथ सिंह यांनी भारतात परतल्यावर म्हटले आहे. 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिले राफेल विमान ताब्यात घेताना या लढाऊ विमानाची पूजा केली होती.  विजयादशमी दिवशी संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या राफेल पूजनामुळे वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर या पूजेवरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही या पूजेवर टीका केली होती.  पहिले राफेल विमान ताब्यात घेतल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह भारतात परतले आहेत. मायदेशी परतल्यावर राफेलच्या पूजेवरून निर्माण झालेल्या वादाबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, ''या देशात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या श्रद्धेनुसार पूजा करण्याचा अधिकार आहे. जर अन्य कुणी असे केले असते, तर मी त्यावर आक्षेप घेतला नसता.''यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, ''मला वाटते की, या प्रकरणात काँग्रेसमध्ये सुद्धा मतभिन्नता असावी. कुठल्याही विषयावर सर्वांचं एकमत असेलच, असे नाही.'' दरम्यान, राफेल विमान भारताच्या ताब्यात आल्याने भारतीय हवाई दलाच्या संरक्षण आणि आक्रमकतेच्या शक्तीत वाढ होईल, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. 

 राजनाथ सिंह यांनी यावेळी राफेल विमान उड्डाणावेळचा अनुभवही कथन केला. ''राफेल विमान प्रति तास 1800 किमी वेगाने उड्डाण करू शकते. मी या विमानातून ताशी 1300 किमी वेगाने उड्डाण केले. तसेच राफेल विमानाचा करार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वामुळेच शक्य झाला, असे त्यांनी सांगिलते.  

३७0 नंतर रा. स्व. संघाचा अजेंडा; राम मंदिर आणि समान नागरी कायदा

राफेलच्या पूजनावरून भाजपा-काँग्रेस आमनेसामने, पंडित नेहरूंचाही पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल 

Video: कारला लिंबू मिरची लावणाऱ्यांना मोदी काय म्हणाले होते?; पंतप्रधानांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहRafale Dealराफेल डीलIndiaभारत