शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

"मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडाच आहे..," पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 06:41 IST

पंकजा मुंडे यांनी पक्षात झालेल्या कोंडीवर आपली अस्वस्थता दिल्लीत येऊन व्यक्त केली.

नवी दिल्ली : ‘मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडीच आहे. काही नाही मिळाले तर मी जाईन ऊस तोडायला,’ अशा स्पष्ट शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पक्षात झालेल्या कोंडीवर आपली अस्वस्थता दिल्लीत येऊन व्यक्त केली.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिल्लीत बुधवारी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, तसेच धनगर समाजाचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यव्यग्रतेमुळे सुरुवातीलाच भाषण करून गडकरी निघून गेले. समाजाचा सर्वांगीण विकास करणे हे अहिल्याबाई होळकरांचे जीवन ध्येय होते. त्यांना धनगर समाजापुरते सीमित करू नका. जानकर यांनी समाजातील गरिबी, बेरोजगारी दूर करून समृद्ध आणि संपन्नतेसाठी काय करता येईल, याविषयी विचार करावा, असा सल्ला गडकरी यांनी यावेळी बोलताना दिला.  

गडकरी निघून गेल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली. मी भाजपची आहे; पण भाजप माझा थोडीच आहे. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण भाजप खूप मोठा पक्ष आहे. आम्ही कोणाला घाबरतच नाही. घाबरणे आमच्या रक्तातच नाही. काही नाही मिळाले तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चारायला, अशा शब्दांत त्यांनी भाजपविषयी रोष व्यक्त केला. महादेव जानकर यांच्यासारखे एक नाही तर हजारो नेते तयार व्हावेत, असे दिवंगत मुंडे साहेबांचे स्वप्न होते, याचे स्मरण पंकजा मुंडे यांनी करून दिले.   

पंकजांची चर्चेत राहिलेली वक्तव्ये...मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री...!पंकजा मुंडे मंत्री असताना २०१५ साली त्यांनी पुण्यात भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवात भाषण करताना मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा बोलून दाखवली हाेती.मला कुठलं पद मिळू नये यासाठी सगळं सुरू आहे का?२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्या पक्ष सोडणार का, याबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून ही खदखद व्यक्त केली हाेती. पदासाठी कोणासमोर हात पसरणे रक्तात नाही...!२०२१ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान नसल्याने हे व्यक्तव्य केले.

महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष तर माझे माहेरच आहे. माझ्या भावाचे ते घर आहे. वडिलांशी भांडण झाले तर भावाच्या घरीही जाऊ शकते. पंकजा मुंडे,भाजप नेत्या

माझी बहीण निश्चित मुख्यमंत्री होईल : जानकरमहादेव जानकर यांनी भाजपवर टीका करताना पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये राहूनही समाजाचे भले करता येणार नाही, अशी भूमिका मांडली. त्या मुख्यमंत्री झाल्या तरी आमच्या बहिणीच्या पक्षामुळे समाजाचे भले होणार नाही. माझी बहीण निश्चित मुख्यमंत्री होईल; पण समाजाचे हित साधले जाणार नाही. कारण रिमोट कंट्रोल वेगळाच असेल. मालक तिसराच असेल, असे जानकर म्हणाले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरी