मी पाक एजंट, मला भारतात स्थायिक व्हायचंय

By admin | Published: April 28, 2017 08:45 PM2017-04-28T20:45:49+5:302017-04-28T20:54:07+5:30

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पाकिस्तानी आयएसआय एजंटला ताब्यात घेतले आहे.

I am a Pak agent, I want to settle in India | मी पाक एजंट, मला भारतात स्थायिक व्हायचंय

मी पाक एजंट, मला भारतात स्थायिक व्हायचंय

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पाकिस्तानी आयएसआय एजंटला ताब्यात घेतले आहे. आयएसआय एजंटला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करतेवेळी त्याने आपण पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचा एजंट असल्याची कबुली दिली असून त्याने भारतात स्थायिक व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाचे नाव मोहम्मद अहमद शेख असे आहे.
आज सकाळी इंधिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षारक्षकांना येथील एका कक्षात त्रासलेल्या अवस्थेत तो बसला होता. आज पहाटे 4 वाजता तो दुबईहून दिल्लीला आला होता. साडेसात वाजता तो काठमंडूला रवाना होणार होता अशी माहिती समोर आली आहे.
सकाळी त्रासलेल्या अवस्थेत मोहम्मद अहमद शेख कक्षातील एका महिला कर्मचाऱ्यकडे गेला आणि त्याने स्वत आपण आयएसआय एजंट असल्याची कबुली दिली. तसेच आपल्याकडे आयएसआयशी संबंधित काही गुप्त माहिती आहे. ती तुम्हाला द्यायची आहे, असेही तो म्हणाला. त्या व्यक्तीच्या या बोलण्यानी ती महिला कर्मचारी थोड्यावेळ निशब्ध झाली होती.य पण तिने आपला संयम बाळगत विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना शेखबाबत कळवले. त्यांनी शेख याला ताब्यात घेतले. आयएसआयचा एजंट असून मला आता भारतात स्थायिक व्हायचे आहे, अशी माहिती शेख याने चौकशीदरम्यान दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले

Web Title: I am a Pak agent, I want to settle in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.