मी आता एकदम ठणठणीत, सौरव गांगुलीनं रुग्णालयातून घेतला डिस्चार्ज

By महेश गलांडे | Published: January 7, 2021 11:53 AM2021-01-07T11:53:08+5:302021-01-07T11:54:00+5:30

गांगुलीने रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना, सर्व डॉक्टरांचे आभार मानले. माझ्यावर उपचार केलेल्या सर्वच डॉक्टरांचे मी आभार मानते, मी आता पूर्णपणे बरा झालोय, असे गांगुलीने म्हटले

I am now very cold, Sourav Ganguly was discharged from the hospital | मी आता एकदम ठणठणीत, सौरव गांगुलीनं रुग्णालयातून घेतला डिस्चार्ज

मी आता एकदम ठणठणीत, सौरव गांगुलीनं रुग्णालयातून घेतला डिस्चार्ज

Next
ठळक मुद्देगांगुलीने रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना, सर्व डॉक्टरांचे आभार मानले. माझ्यावर उपचार केलेल्या सर्वच डॉक्टरांचे मी आभार मानते, मी आता पूर्णपणे बरा झालोय, असे गांगुलीने म्हटले

कोलकाता - टीम इंडियाचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यास मागील आठवड्यात हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्याच्यावर कोलकातातील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याची प्रकृती सुधारली असून आज सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच, गांगुलीने आता मी एकदम ठणठणीत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. गांगुलीच्या या प्रतिक्रियेमुळे जगभरातील कोट्यवधी चाहत्यांना आनंद झालाय. 

गांगुलीने रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना, सर्व डॉक्टरांचे आभार मानले. माझ्यावर उपचार केलेल्या सर्वच डॉक्टरांचे मी आभार मानते, मी आता पूर्णपणे बरा झालोय, असे गांगुलीने म्हटले. सौरवला बुधवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता, पण त्यानेच आणखी एक दिवस रुग्णालयात राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे, त्याला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. 

सौरवला डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयाबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी, दादाने चाहत्यांना उद्देशून छोटेखानी भाषण केले. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांमुळे मला ताकद मिळाल्याचेही गांगुलीने म्हटले.

प्रसिद्ध सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन गांगुलीच्या प्रकृतीची पाहणी केली. अनेक भारतीयांमध्ये हृदयासंदर्भात आढळणारा आजार गांगुलीला झाला आहे. पण, त्यामुळे त्याच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही. त्याच्यावर नित्यक्रमानं अँजिओप्लास्टीची गरज आहे आणि औषध व काळजी घेतल्यानंतर तो पुन्हा पूर्वीसारखा कामकाज करू शकतो. पुढील दोन आठवड्यात त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येतील, असे शेट्टी यांनी सांगितले होते. गांगुलीवर उपचार करण्यासाठी १३ वैद्यकिय सदस्यांची टीम काम करत होती. गांगुलीची अँजिओप्लास्टी करण्यात आली. 

जाहीरात मागे

दरम्यान, गांगुली आजारी पडल्यानंतर तो जाहिरात करत असलेल्या Fortune Rice    Bran cooking oil च्या सर्व जाहिराती मागे घेण्यात आल्याचे अदानी विल्मारने जाहीर केले. Fortune Rice Bran cooking oil हे निरोगी हृदयासाठी फायद्याचे असल्याची जाहिरात गांगुलीनं केली होती. या जाहिराती मागे घेण्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली व त्यांना ट्रोलही केलं गेलं. ''हे तेल तुमची प्रतिकारशक्ती वाढवते,''अशी या जाहिरातीची टॅगलाईन होती. गांगुलीला हृयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना ट्रोल केले गेले. छातीत दुखू लागल्यामुळे शनिवारी गांगुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्याची प्रकृती सुधारली असून त्याला डिस्चार्ज दिला जाईल. त्याच्यावर घरीच उपचार सुरू राहतील, असे डॉक्टरांनी सांगितले.  

आक्रमक कर्णधार

भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. आरे ला कारेनं उत्तर देण्याच्या त्याच्या शैलीनं टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला प्रतिस्पर्ध्यांना भिडण्याची ताकद दिली. २००३ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियानं १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नेटवेस्ट सीरिजमध्ये नमवल्यानंतर लॉर्ड गॅलरीत गांगुलीनं जर्सी काढून केलेलं सेलिब्रेशन आजही सर्वांच्या लक्षात आहे.
 

Web Title: I am now very cold, Sourav Ganguly was discharged from the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.