शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेपासून दूर राहायला मी काही शहेनशाह नाही - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 18:14 IST

देशातील जनतेपासून दूर राहायला मी काही शहेनशाह किंवा हुकूमशाह नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

 नवी दिल्ली - देशातील जनतेपासून दूर राहायला मी काही शहेनशाह किंवा हुकूमशाह नाही. जनतेचे प्रेम आणि सदिच्छांच्या माध्यमातूनच मला शक्ती मिळते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी त्यांच्या सुरक्षेसंबंधात प्रसिद्ध करणाऱ्या इशाऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज नावाच्या मासिकाला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी मोदींना त्यांच्या सुरक्षेबाबत गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या खबरदारीच्या इशाऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले, "जनतेपासून दूर जायला मी काही हुकूमशाह किंवा शहेनशाह नाही. जनतेच्या शुभेच्छा आणि सदिच्छांमधून मला बळ मिळत असले. जेव्हा मी प्रवास करत असतो तेव्हा सर्व वयोगटातील सर्व समाजातील व्यक्ती माझ्या स्वागतासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले मी पाहतो. अशावेळी मी माझ्या कारमध्ये बसून राहू शकत नाही. म्हणूनच मी त्यांचे स्वागत स्वीकारण्याचा प्रयत्न करतो." 

यावेळी भाजपाविरोधात महाआघाडी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विरोधी पक्षांवरही मोदींनी निशाणा साधला. "विरोधी पक्षांची कुठलीही महाआघाडी  नाही. तिथे फक्त पंतप्रधानपदासाठी स्पर्धा सुरू आहे. राहुल गांधी म्हणालेत की पंतप्रधान व्हायला तयार आहे, पण त्यांना तृणमूल काँग्रेसचा विरोध आहे. ममताजींना पंतप्रधान व्हायचे आहे, पण त्याला डाव्या पक्षांचा विरोध आहे. तर समाजवादी पक्षाच्या नेत्यांना वाटते की पंतप्रधानपदासाठी इतरांपेक्षा आपणच अधिक योग्य आहोत. या सर्वांचे लक्ष फक्त सत्ता हस्तगत करण्याकडे आहे. जनकल्याणाकडे नाही." असे मोदी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारत