आज सोमवारी (१ डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. आजच नवनियुक्त राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांच्या जीवनातील काशी यात्रेचा प्रसंग सांगितला.
नॉन-व्हेज सोडण्याच्या घटनेचा उल्लेख -यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांच्या जीवनातील एका खास घटनाही सांगितली. ते म्हणाले, "आपण मला सांगितले होते की, आपण मांसाहारी होतात, पण आपल्या पहिल्या काशी भेटीतील पूजेनंतर आणि माता गंगाचा आशीर्वाद घेतल्यानंतर, आपल्या मनात एक संकल्प जागृत झाला आणि त्या दिवसापासून आपण मांसाहार सोडला. मांसाहार करणारे वाईट आहेत, असे मी म्हणत नाही, पण काशीतील विचार आपल्या या निर्णयासाठी प्रेरक बनला. खासदार म्हणून माझ्यासाठी हे एक अविस्मरणीय उदाहरण राहील."
राधाकृष्णन यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "साधारण पार्श्वभूमीतून उठून उपराष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे, हीच भारतीय लोकशाहीची खरी ताकद आहे." तसेच, वरिष्ठ सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी राधाकृष्णन यांचा अनुभव उपयुक्त ठरेल," असेही मोदी म्हणाले. सीपी राधाकृष्णन हे देशाचे १५ उपराष्ट्रपती आहेत.
दरम्यान, खासदार जेपी नड्डा यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विधान उद्धृत करत, सदस्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. विरोधकांच्या वतीने काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभापतींचे स्वागत करताना सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
Web Summary : In Parliament, Modi lauded Vice President Radhakrishnan's decision to give up non-vegetarian food after visiting Kashi. He clarified he doesn't condemn non-vegetarians, highlighting Radhakrishnan's journey as inspiring and a testament to Indian democracy.
Web Summary : संसद में, मोदी ने उपराष्ट्रपति राधाकृष्णन के काशी जाने के बाद मांसाहारी भोजन छोड़ने के फैसले की सराहना की। उन्होंने स्पष्ट किया कि वे मांसाहारियों की निंदा नहीं करते, राधाकृष्णन की यात्रा को प्रेरणादायक और भारतीय लोकतंत्र का प्रमाण बताते हैं।