I am not in the race of prime ministership; After the elections, the posthumous claimant | मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतच नाही; निवडणुकांनंतर ठरेल पदाचा दावेदार
मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतच नाही; निवडणुकांनंतर ठरेल पदाचा दावेदार

मैनपुरी : आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे समाजवादी पक्षाचे (सप) संस्थापक मुलायमसिंह यादव यांनी सोमवारी स्पष्ट केले. मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमेवत पुत्र अखिलेश
यादवही होते. सप-बसप युतीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे, या प्रश्नावर मुलायमसिंह म्हणाले की, ते लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर ठरविले जाईल. अखिलेश म्हणाले की, मुलायमसिंह देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील. समाजवादी पक्षाची सारी सूत्रे दोन वर्षांपूर्वी अखिलेश यादव यांच्या हाती गेल्यानंतर पिता-पुत्रांचे संबंध आणखी बिघडले आणि २०१७च्या विधानसभा निवडणुकांचा मुलायमसिंह यांनी सपचा प्रचार केला नव्हता. त्यांनी अखिलेशविरोधात वेळोवेळी टीकाही केली होती. लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात अखिलेश दिरंगाई करत असल्याचा आरोपही मुलायमसिंह यांनी गेल्या महिन्यात केला होता. सपने बसपशी केलेल्या युतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

मैनपुरीमधून मुलायमसिंह यांच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय त्यांचे भाऊ शिवपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पार्टी व काँग्रेसने घेतला आहे. या मतदारसंघातील भाजप उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. 

आदराने मुख्यमंत्रीच म्हणतात!
मैनपुरीमधून मुलायमसिंह १९९६, २००४, २००९, २०१४ मध्ये निवडणुकांत प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते. सपने पोटनिवडणुकीसह ही जागा १९९६ पासून आठ वेळा जिंकली आहे.

भाजपला इथे एकदाही विजय मिळालेला नाही. तिसऱ्या टप्प्यात
२८ मार्च रोजी या मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघात ग्रामीण मतदार अधिक असून यादवांची संख्या ३५% आहे.

उत्तर प्रदेशचे तीनदा मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या मुलायमसिंह यांना येथे अनेक जण आजही आदराने ‘मुख्यमंत्री’ म्हणतात.

मुलायमसिंह यांचे मताधिक्य वाढेल?
मुलायमसिंहना २००९मध्ये ३,९२,३०८मते (५६.४४ टक्के) मिळाली होती, तर २०१४ साली मोदी लाट असूनही मुलायमसिंह ५,९५,९१८ मते (६० टक्के) मिळवून विजय झाले होता. आता सप व बसप युती असल्याने मुलायमसिंह यांच्या मताधिक्यात आणखी वाढ होईल, असे म्हटले जाते.

Web Title: I am not in the race of prime ministership; After the elections, the posthumous claimant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.