शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मी 'विहिंप'मध्ये नाही, 16 एप्रिलपासून बसणार उपोषणाला - प्रवीण तोगडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 22:51 IST

विश्व हिंदू परिषदेतील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषदेतील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी आता विश्व हिंदू परिषदेत नसून सोमवारी 16 एप्रिलपासून उपोषणास बसणार, असे त्यांनी सांगितले आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांना शनिवारी मोठा धक्का बसला आहे. विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रवीण तोगडिया यांच्या गटातील राघव रेड्डी आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल निवृत्त न्या. विष्णू सदाशिव कोकजे यांच्यात लढत होती. यात कोकजे 131 मते मिळवून राघव रेड्डींचा पराभव केला. राघव रेड्डींना केवळ 60 मते मिळाली.

विश्व हिंदू परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नव्या कार्यकारिणीत तोगडिया गटातील एकाही व्यक्तीला स्थान मिळू शकलेले नाही.यावर तोगडिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ प्रवीण तोगडिया यांची उचलबांगडी करण्याच्या उद्देशानं 52 वर्षांनंतर पहिल्यांदाच विहिंपच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक घेण्यात आली होती, असे म्हटले जात आहे. व या प्रयत्नात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यशदेखील मिळाले आहे. दरम्यान, निवडणुकीमध्ये विष्णु सदाशिवम् कोकजे यांना 192 पैकी 131 मतं मिळाली. तर प्रवीण तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांना 60 मतं मिळाली असून यातील एक मतं अवैध ठरवण्यात आले.

तोगडियांनी लावला बोगस मतदारांचा आरोप 52 वर्षांत प्रथमच विहिंपमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आल्यानं ही निवडणूक विशेष अशी ठरली. सोबतच प्रवीण तोगडिया यांचे भाजपा व आरएसएससोबत असलेल्या नात्यात कटुता आल्यानं अध्यक्षपदी नेमके कोण विराजमान होणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. दरम्यान, निवडणुकीपूर्वीच विहिंपच्या मतदार यादीमध्ये 40 बोगस मतदार असल्याचा आरोप तोगडिया यांनी केला होता.

दरम्यान, डिसेंबर 2017 मध्ये तोगडिया आणि रेड्डी यांच्या पदाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी 29 डिसेंबर 20017ला भुवनेश्वरमध्ये बैठकदेखील  झाली होती.  मात्र तोगडिया आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत कोकजे यांच्या नावाला विरोध केला होता.   

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडियाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदी