शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, राहुल गांधी यांनी केले स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 15:58 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे.  पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या अनिश्चिततेदरम्यान मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नव्या अध्यक्षाची निवड काँग्रेसची कार्यकारी समिती करेल, असेही त्यांनी सांगितले. बुधवारी प्रसारमाध्यमांनी संवाद साधताना राहुल गांधी यांनी आपल्या राजीनाम्याविषयी भूमिका स्पष्ट केली. मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावर आता मी नाही. आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय पक्षाची कार्यकारी समिती घेईल. तसेच पक्षाने अध्यक्षपदासाठी  विनाविलंब निवडणूक घेऊन नव्या अध्यक्षाची निवड केली पाहिजे. आधीच राजीनामा दिलेला असल्याने मी या प्रकियेमध्ये सहभागी नसेन.''असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक पत्र प्रसिद्ध केले आहे. काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने या पराभवाचे उत्तरदायित्व स्वीकारून मी राजीनामा देत आहे,'''असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

 मे महिन्यात आटोपलेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला होता. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले होते. या पराभवामुले व्यथित झालेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच काँग्रेसचा यापुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र राहुल गांधी यांनी आपला निर्णय बदलावा यासाठी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. मात्र आज त्यांनी ज्याप्रकारे आपण काँग्रेसचे अध्यक्ष नाही, असे सांगितले त्यावरून ते आपला निर्णय बदलणार नाहीत, असे स्पष्ट होत आहे. दरम्यान, आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी सुमारे 40 मिनिटे चर्चा केली होती. तसेच सोमवारी काँग्रेसच्या पाच राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची भेट घेत त्यांना अध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती केली होती. मात्र राहुल गांधी यांनी या मुख्यमंत्र्यांची मागणी धुडकावून लावत पक्षासाठी नवा अध्यक्ष शोधण्यास सांगितले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण