'मी पवारसाहेबांना टोला मारत नाही, तर उदयनराजेंना का मारू?'

By महेश गलांडे | Published: October 28, 2020 05:04 PM2020-10-28T17:04:53+5:302020-10-28T17:05:22+5:30

'मी केव्हाच नाही म्हटलेलं नाही, माझं आणि त्याचं एकदम चांगलं आहे. माझे आणि त्यांचे नेहमी फोन होतात, नेहमी चर्चा होते. आता एका कार्यक्रमाला त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते आले नसतील.

'I am not attacking Pawar, why should I kill Udayan Raje?', sambhajiraje bhosale | 'मी पवारसाहेबांना टोला मारत नाही, तर उदयनराजेंना का मारू?'

'मी पवारसाहेबांना टोला मारत नाही, तर उदयनराजेंना का मारू?'

Next
ठळक मुद्दे'मी केव्हाच नाही म्हटलेलं नाही, माझं आणि त्याचं एकदम चांगलं आहे. माझे आणि त्यांचे नेहमी फोन होतात, नेहमी चर्चा होते. आता एका कार्यक्रमाला त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते आले नसतील.

नवी दिल्ली - नवी दिल्ली - मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षण स्थगितीवर आता चार आठवड्यांनी पुढील सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. या सुनावणीला सरकारी वकील हजर नव्हते, त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावरुन, खासदार संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारी वकील कुठे आहेत? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून केला जातो आणि तिथे वकील उपस्थित नसतात हे दुर्देव आहे, गंभीर आहे. त्यामुळे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जिथे कुठे असतील, त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करण्याची गरज आहे, असं संभाजीराजे यांनी सांगितले. 

संभाजीराजे भोसले यांनी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षणासाठी सरकारची गंभीरत दिसत नसल्याचं म्हटलंय. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत संभाजीराजेंनी आरक्षणासंदर्भातील विविध विषयांवर भाष्य केले. त्यावेळी, उदयनराजेंबद्दलही ते बोलले. उदयनराजे आमचे भाऊ आहेत, त्यांना टोला का मारू, असे संभाजीराजेंनी म्हटले. दोन राजे एकत्र का येत नाहीयेत. वारंवार दिसून आलं आहे की तुम्ही एकमेकांच्या समोर येणं टाळत आहात. आरक्षण आम्हाला नाही, तर कोणालाच नाही, अशी भूमिका अत्यंत चुकीची आहे, असा टोलासुद्धा तुम्ही उदयनराजेंना हाणला आहे, असा प्रश्न बीबीसी मराठीच्या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, संभाजीराजेंनी उत्तर दिलंय. 

'मी केव्हाच नाही म्हटलेलं नाही, माझं आणि त्याचं एकदम चांगलं आहे. माझे आणि त्यांचे नेहमी फोन होतात, नेहमी चर्चा होते. आता एका कार्यक्रमाला त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते आले नसतील. उद्या कुठल्याही कार्यक्रमाला मी तयार आहे. मी तर केव्हाही तयार आहे. माझ्या मनात काहीच खोट नाही. मी पवार साहेबांना टोला मारत नाही, तर उदयनराजेंना का मारू. ते तर आमचे भाऊ आहे, असे उत्तर संभाजीराजेंनी दिलं. 

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी आणि शिक्षणामध्ये मिळाल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठण्यासाठी राज्य सरकारनं कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. मराठा समाजाच्या याचिकाकर्त्यांकडून ही सुनावणी 5 सदस्यीय खंडपीठाकडे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, सरकार मराठा आरक्षण प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचा आरोप याचिकाकर्ते विनोद पाटील आणि विरोधकांकडून होत आहे. यासंदर्भात खासदार संभाजीराजे भोसले यांनीही सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

मोदींशी 3 वेळा पत्रव्यवहार केला

मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींशी काय पत्रव्यवहार झाला, भेटीची वेळ मागितली होती का? असा प्रश्न संभाजीराजेंना विचारण्यात आला होता. त्यावर संभाजीराजेंनी उत्तर देताना, मोदींना तीनवेळा पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना सोबत घेऊन मी पंतप्रधानांना भेटणार आहे, त्यासाठी मी मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती. पण, मला अद्याप भेटीची वेळ मिळाली नाही. कदाचित, कोरोनाचं संकट असल्यामुळे एवढ्या सर्व खासदारांना एकत्र भेटणे शक्य नसल्याने तुर्तास भेट देण्यात आली नसेल, असे संभाजीराजेंनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटले. तसेच, आजपर्यंत मोदींना 3 पत्रे पाठवली आहेत, त्यांच्या उत्तराची अपेक्षा आहे, असेही संभाजीराजेंनी म्हटले. 

मी आता थकलो आहे

मी किती वेळा बोलायचं. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहेत.  मी आता बोलून बोलून थकलो आहे. पूर्णपणे थकून गेलो आहे. सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत. एवढीच विनंती असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. 
 

Web Title: 'I am not attacking Pawar, why should I kill Udayan Raje?', sambhajiraje bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.