इस्लामिक स्टेटच्या धमक्यांना मी घाबरत नाही - असदुद्दीन ओवैसी
By Admin | Updated: January 7, 2016 19:33 IST2016-01-07T19:16:34+5:302016-01-07T19:33:03+5:30
इस्लामिक स्टेटच्या धमक्यांना मी घाबरत नाही आणि इस्लामशी काहीही संबंध नसलेल्या इस्लामिक स्टेटच्या विरोधात मी बोलत राहणार असे प्रत्युत्तर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसींनी दिले आहे.

इस्लामिक स्टेटच्या धमक्यांना मी घाबरत नाही - असदुद्दीन ओवैसी
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ७ - इस्लामिक स्टेटच्या धमक्यांना मी घाबरत नाही आणि इस्लामशी काहीही संबंध नसलेल्या इस्लामिक स्टेटच्या विरोधात मी बोलत राहणार असे प्रत्युत्तर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसींनी दिले आहे.
ओवैसींच्या ट्विटरवॉलवर तोंड गप्प करा व लोकशाही सोडून द्या असे सांगण्यात आले होते. इस्लामिक स्टेटबद्दल बोलणं बंद करा, तुम्हाला सत्य माहीत नाहीये, लवकरच इस्लामिक स्टेट भारताचा ताबा घेणार आहे, असं ओवेसींना सांगण्यात आलं होतं.
तर आपल्याला रोजच धमक्या येत असतात, असं सांगत मला सुरक्षेची गरज नाही, मी बोलतच राहणार असं ओवैसी म्हणाले. दीड लाख मुस्लीमांचं शिरकाण करणा-या इस्लामिक स्टेटविरोधात अनेक विद्वानांनी प्रतिकूल मत दिल्याचे व ही संघटना दहशतवादी असल्याचे म्हटल्याचे ओवैसींनी म्हटले आहे.