शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

मी मुस्लीम आहे आणि मला मुस्लीमच राहायचं आहे –  हादिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 20:38 IST

केरळमधील वादग्रस्त लव्ह जिहाद प्रकरणी 25 वर्षीय हादिया उर्फ आखिला अशोकन हिने मंगळवारी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये तिने मी मुस्लीम आहे आणि मुस्लीमच राहणार असल्याचे म्हटले आहे. यासोबत तिने पती शफी जहानबरोबरच राहणार असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : केरळमधील वादग्रस्त  लव्ह जिहाद प्रकरणी 25 वर्षीय हादिया उर्फ आखिला अशोकन हिने मंगळवारी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये तिने मी मुस्लीम आहे आणि मुस्लीमच राहणार असल्याचे म्हटले आहे. यासोबत तिने पती शफी जहानबरोबरच राहणार असल्याचे म्हटले आहे. हादियाने धर्मपरिवर्तन करत शफी जहानशी निकाह केला होता. दरम्यान, याप्रकरणी 22 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात हादियाने 25 पानांचे प्रतिज्ञापत्र सादर आहे. या प्रतिज्ञापत्रात तिने असे म्हटले आहे की, मी स्वखुशीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. हा निर्णय कुठल्याही दबावामध्ये घेतलेला नाही. तिने मी मुस्लीम आहे आणि मुस्लीमच राहणार असल्याचे म्हटले आहे. यासोबत तिने पती शफी जहानबरोबरच राहणार असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.  दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने हादियाची वडिलांच्या ताब्यातून मुक्तता करून तिला एका संस्थेच्या हवाली केले होते व तिचे शिक्षण सुरू ठेवण्यास सांगितले होते. गेल्या महिन्यांत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही हादियाच्या निकाहासंदर्भात तपास करण्याचे व कुठलेही बेकायदेशीर कृत्य घडले आहे का याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.

काय आहे हादिया लव्ह जिहाद प्रकरण?अखिला अशोकन ऊर्फ हादियाने धर्मपरिवर्तन करत शफीन जहानशी निकाह केला होता. यानंतर हादियाच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेत लग्न रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेत हादियाचं जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं असून, शफीनचा इसिसशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. केरळ उच्च न्यायालयाने कलम 226 अंतर्गत विवाह रद्द केला होता आणि हादियाला वडिलांकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. यानंतर शफीनने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाच्या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच वडील मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत, असे म्हटले होते. 

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहादSupreme Courtसर्वोच्च न्यायालय