शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मीच काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्ष! सोनिया गांधींनी असंतुष्टांना सुनावले, थेट संपर्क साधण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 06:31 IST

काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल आवश्यक आहेत, अशी मागणी २३ नाराज नेत्यांनी केली होती. पूर्णवेळ अध्यक्ष नसताना निर्णय कोण घेतो हेच कळत नाही. पक्षाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी कार्यकारिणीची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनीही केली होती.

नवी दिल्ली : मीच काँग्रेसची पूर्णवेळ व सक्रिय अध्यक्ष आहे. पक्षाचे नेते मला थेट भेटू शकतात, आपले म्हणणे मांडू शकतात. त्यांनी प्रसारमाध्यमांमार्फत माझ्याशी बोलू नये, मला स्पष्टवक्तेपणा आवडतो, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी आपल्याच पक्षांच्या नेत्यांना कार्यकारिणीच्या बैठकीत सुनावले. भाजप व मोदी सरकारवरही त्यांनी सडकून टीका केली.काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल आवश्यक आहेत, अशी मागणी २३ नाराज नेत्यांनी केली होती. पूर्णवेळ अध्यक्ष नसताना निर्णय कोण घेतो हेच कळत नाही. पक्षाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी कार्यकारिणीची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनीही केली होती.  त्याबाबत सोनिया म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे; पण पक्षात ऐक्य व शिस्त आवश्यक आहे. पक्षहितावर लक्ष ठेवल्यास  निवडणुकांत आपली कामगिरी चांगली असेल. पक्ष पूर्वीसारखा सक्रिय व आक्रमक व्हावा, असे सर्वांना वाटत आहे. पण त्यासाठी पक्षाला सर्वोच्च महत्त्व द्यायला हवे.राहुल गांधी यांना साकडेराहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, असे मत अशोक गेहलोत, अंबिका सोनी तसेच अन्य अनेक नेत्यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, वेळ आल्यावर मी प्रस्तावाचा विचार करेन.नवा अध्यक्ष पुढील वर्षीनवा पक्षाध्यक्ष ३० जूनपर्यंत निवडण्याचे ठरले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली. मात्र आजच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला. पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पुढील सप्टेंबरमध्ये होणार असून, त्याआधी सर्व पातळ्यांवरील संघटनात्मक निवडणुका होतील.केंद्र सरकार शेतकरीविरोधी; महागाईमुळे सामान्यांचे हालभाजपवर टीका करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, लखीमपूरमधील हिंसाचारातून भाजप शेतकरीविरोधी असल्याचे सिद्ध झाले आहे. देशाची आर्थिक स्थितीही चांगली नाही. सरकारी उपक्रम विकणे हेच मोदी सरकारचे धोरण आहे. अन्नधान्य, इंधन महागले असून, त्यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत.मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अयशस्वी ठरले आहे. भारत-चीन सीमावाद अधिक वाढला आहे. बिगरभाजप सरकारे असलेल्या राज्यांना मोदी सरकार सातत्याने अडचणीत आणत आहे, असा आरोप करून त्या म्हणाल्या की, काश्मीरमध्ये निरपराध लोकांच्या गेल्या काही दिवसांत हत्या झाल्या. तिथे जातीय सलोखा राखण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे.काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला प्रियांका गांधी यांच्यासह राजस्थान, पंजाब व छत्तीसगडचे मुख्यमंत्री अनुक्रमे अशोक गेहलोत, चरणजितसिंग चन्नी व भूपेश बघेल तसेच वेणुगोपाल, आनंद शर्मा आदी ५२ नेते उपस्थित होते.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस