शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

"मी तर केवळ महिला शिक्षणासंदर्भात..."; 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीश कुमारांनी जाहीर माफी मागितली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 12:04 IST

यासंदर्भात आता नितीश यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ज्यात त्यांनी जाहीर माफी मागितली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात विधानसभेत केलेल्या बेताल वक्तव्यानंत, केवळ बिहारच नव्हे, तर संपूर्ण देशातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात आता नितीश यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ज्यात त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. नितीश म्हणाले, 'मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो. मी काही चूक बोललो असेल, मी माफी मागतो. जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, मी त्यांचेही अभिनंदन करतो." 

पुढे मुख्यमंत्री नितीश म्हणाले, आम्ही बिहारमध्ये मोठ-मोठी कामे केली आहेत आणि आता आम्ही महिलांच्या उत्थानासाठीही काम करत आहोत. एवढेच नाही, तर नितीश यांनी सभागृहातही माफी मागितली आहे. आपल्या वक्तव्याचा आपल्याला खेद वाटतो, असे म्हटले आहे. तसेच, ते त्यांचे वक्तव्य मागे घेत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे."

काय म्हणाले होते नितीश - बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (७ नोव्हेंबर) चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते, "बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूलं जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल."

मी नितीश कुमार यांच्याकडे तत्काळ आणि स्पष्ट माफीची मागणी करते - नितीश कुमार यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. नितीश यांच्या या वक्तव्यानंतर, आता राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगानेही भाष्य केले आहे. 'या देशातील प्रत्येक महिलेच्या वतीने आणि राष्ट्रीय महिला आयोगाची अध्यक्ष या नात्याने, मी नितीश कुमार यांच्याकडे तत्काळ आणि स्पष्ट माफीची मागणी करते. विधानसभेतील त्यांचे असभ्य वक्तव्य, हे प्रत्येक महिलेच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा अपमान आहे. त्याची भाषा अत्यंत अपमानास्पद आणि घाणेरडी आहे. जर लोकशाहीत एखादा नेता उघडपणे अशा स्वरुपाचे भाष्य करत असेल, तर राज्यातील महिलांची काय स्थिती असेल, याची कल्पना येऊ शकते. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करते, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारvidhan sabhaविधानसभा