शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्याला येतोय, हिंमत असेल तर अटक करा, अमित शहांचे ममता बॅनर्जींना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 14:29 IST

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेली लढाई निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अधिकच तीव्र झाली आहे.

जॉयनगर - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेली लढाई निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अधिकच तीव्र झाली आहे. दरम्यान, आज जॉयनगर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेला संबोधित करताना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जींना थेट आव्हान दिले आहे. जॉयनगर येथील प्रचारसभेत जय श्री राम च्या घोषणा अमित शहा यांनी दिल्या. तसेच या रॅलीनंतर मी कोलकात्याला जात आहे. ममता बॅनर्जींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अटक करून दाखवावे, असे आव्हान अमित शहा यांनी दिले. 

''आज बंगालमध्ये माझ्या तीन सभा होत्या. मला जाधवपूर येथेही सभा घ्यायची होती. या मतदारसंघातून ममता बॅनर्जींचे भाचे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपाला दिलेल्या सभेची परवानगी रद्द केली. आता आम्हाला बोलू द्या अथवा न बोलू द्या. लोकसभा निवडणुकीत टीएमसीला पराभूत करण्याचे बंगालमधील जनतेने निश्चित केले आहे.'' असे अमित शहा म्हणाले. 

 यावेळी अमित शहा यांनी ममता बॅनर्जींच्या भाच्यावरही टीका केली. ममता बॅनर्जीं यांनी आपल्या भाचासोबत मिळून सिंडिकेट्स बनवले आहे. इथे लोकांकडून विनाकारण कर वसूल केला जात आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी भाचा कर वसूल करत आहेत. अमित शहा यांनी बंगालमधील दुर्गा पूजेवरूनही ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. ''दुर्गा पूजा ही बंगालची ओळख आहे. पण ममता बॅनर्जी यांनी या दुर्गापूजेवरही निर्बंध आणले. सरस्वती पूजा केली तर ममता बॅनर्जींचे गुंड मारामारी करतात. श्रीराम बोलू शकत नाही कारण ममता बॅनर्जींना गुंडांची मते हवी आहेत. बंगालमध्ये भाजपाला 23 लोकसभेच्या जागा मिळाल्या तर इथे पुन्हा एकदा सन्मानाने दुर्गापूजा सुरू होईलस असेही अमित शहा यांनी सांगितले.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019