शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"मी लढणारा योद्धा.."; हिमाचलचे CM  सुखविंदर सिंह सुख्यू यांनी फेटाळल्या राजीनाम्याच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 14:01 IST

काँग्रेस पक्ष एकजूट असून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेन, असा दावाही मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांनी केला आहे.

CM Sukhvinder Singh Sukhu ( Marathi News ) : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांनी काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता स्वत: सुखविंदर सुख्यू यांनी समोर येत या चर्चा फेटाळून लावल्या असून मी राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "मी सामान्य घरातून आलेला आणि संघर्ष करणारा योद्धा आहे. विजय नेहमी संघर्षाचाच होतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण आपलं बहुमत सिद्ध करू," असा विश्वास मुख्यमंत्री सुख्यू यांनी व्यक्त केला आहे.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी केलेलं क्रॉस वोटिंग आणि आज सकाळी विक्रमादित्य सिंह यांनी दिलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र सुख्यू यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. "भाजप घाबरला असल्याने त्यांच्याकडून माझ्या राजीनाम्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्या राजीनाम्याने काँग्रेस पक्षात खळबळ उडून आमदार फुटतील असं त्यांना वाटत आहे. मात्र काँग्रेस पक्ष एकजूट असून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेन," असा दावाही सुख्यू यांनी केला आहे.

दरम्यान. सरकारकडून  माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा अवमान होत असल्याचं सांगत त्यांचे पुत्र आणि विद्यमान मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आज सकाळी घेतला. तसंच काँग्रेसच्या सहा आमदारांनीही मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारलं आहे. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता असताना वर्तवली जात आहे.

हिमाचल प्रदेशातील सरकार वाचवण्यासाठी जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर सोपवली असून मुख्यमंत्र्यांना हटवावं लागलं तरी चालेल पण सरकार कोसळता कामा नये, अशा सूचना काँग्रेस नेतृत्वाकडून या दोन्ही नेत्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा