शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पुढच्या वर्षी भारतात धावणार अशी ट्रेन, जी फक्त जर्मनीकडेच आहे; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 09:48 IST

Hydrogen-powered train : ओडिशातील भुवनेश्वर येथील SOA विद्यापीठातील एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

नवी दिल्ली : रेल्वेविषयी देशातील लोकांच्या मनात एक वेगळेच स्थान आहे. प्रवासाची इतर प्रगत साधने कितीही उपलब्ध झाली, तरी रेल्वे प्रवासाविषयी लोकांचे मत वेगळे आहे. भारतीय रेल्वेने देशभरात आपले जाळे पसरवले असून गेल्या काही दिवसांत रेल्वेच्या आधुनिकतेवर जास्त भर दिला जात आहे. दरम्यान, आता रेल्वे भारतात हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन्स बनवत असून त्या 2023 पर्यंत तयार होतील. यासंदर्भातील माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली. ओडिशातील भुवनेश्वर येथील SOA विद्यापीठातील एका कार्यक्रमात अश्विनी वैष्णव उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वे गतिशक्ती टर्मिनल धोरणांतर्गत रेल्वे नेटवर्कद्वारे दुर्गम भागात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. हे काम वेगाने सुरू आहे. याचबरोबर, भारतात हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन्स स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आल्या असून गेल्या दोन वर्षांपासून या ट्रेन्स कोणताही मोठा दोष नसताना धावत आहेत. अशा आणखी वंदे भारत ट्रेन्स आयसीएफमध्ये बनवल्या जात असून त्या लवकरच सेवेत आणल्या जातील, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. 

अलीकडेच वंदे भारत ट्रेनला रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तर आतापर्यंत केवळ जर्मनीने हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन्स तयार केल्या आहेत. या वर्षी जर्मनीने हायड्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनची पहिली खेप सुरू केली आहे. फ्रेंच कंपनी आल्सटॉमने 92 मिलियन डॉलर खर्च करून 14 ट्रेन्स तयार केल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वी रेल्वे आणि ट्रॅक व्यवस्थापनाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, "आमचे लक्ष केवळ ट्रेन बनवण्यावर नाही. आम्ही ट्रॅक मॅनेजमेंट सिस्टमवर देखील काम करत आहोत जेणेकरून सेमी हायस्पीड ट्रेन्स चालवता येतील. वंदे भारत ट्रेन्सच्या ट्रायल रनमध्ये आम्ही दाखवले की, 180 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या ट्रेनमध्ये पाण्याने भरलेला ग्लास ठेवला होता आणि तो अजिबात हलला नाही, पण यामुळे जगाला आश्चर्यचकित केले."

72  वंदे भारत ट्रेन्सचे उत्पादन सुरूवंदे भारतच्या यशस्वी चाचणीनंतर उर्वरित 72 ट्रेन्सचे उत्पादन सुरू होईल, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ते म्हणाले, "तिसर्‍या वंदे भारत ट्रेनचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर असेल. हा 52 सेकंदात 0-100  किमी प्रतितास वेग पकडेल. तर बुलेट ट्रेन हा वेग 55 सेकंदात पकडते. पहिल्या टप्प्यातील वंदे भारत ट्रेन्स 54.6 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकतात आणि 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकतात. सध्या दोन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. एक नवी दिल्ली ते वाराणसी आणि दुसरी नवी दिल्ली ते वैष्णोदेवीपर्यंत धावते."

टॅग्स :railwayरेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव