शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसाला फुटला मायेचा पाझर, अनाथ चिमुकलीला पाजले दूध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 17:43 IST

हैदराबादमधील एका महिला पोलिसाने आपल्या मातृत्वाने अन् दातृत्वाने सर्वांचीच मने जिंकली.

हैदराबाद - पोलीस म्हणजेही शेवटी माणूसचं की, त्यात बहिण आली, बाप आला अन् आईसुद्धा. हैदराबादच्या बेगमपेठ पोलीस ठाण्यात अशीच एका खाकी वर्दीतल्या महिलापोलिसातली आई जागली, रडणाऱ्या तान्हुलीला पाहून या आईला मायेचा पाझर फुटला. खाकी वर्दीतल्या या आईच्या मायेनं एका अनाथ लेकराला दूध पाजलं. महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका यांनी भुकेने व्याकूळ झालेल्या 2 महिन्यांच्या चिमुकलीला स्तनपान केले. त्यानंतर, खाकी वर्दीतल्या मातोश्रीचं सोशल मीडियासह सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

हैदराबादमधील एका महिला पोलिसाने आपल्या मातृत्वाने अन् दातृत्वाने सर्वांचीच मने जिंकली. बेगमपेठ येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल प्रियंका सध्या बाळंतपणाच्या रजेवर आहेत. मात्र, पतीच्या एका फोन कॉलवर प्रियंका यांनी पोलीस ठाण्यात येऊन खाकी वर्दीमागील मातृत्वाचं दर्शन दिलं. येथील उस्मानिया रुग्णालयाजवळ एका महिलेनं बाहेर उभा असलेल्या पुरुषाच्या हातात आपले 2 महिन्यांच बाळ दिल. मी या बाळासाठी पाणी घेऊन येते असे सांगून ती महिला निघून गेली. बराच वेळा झाला तरी संबंधित महिला न आल्यामुळे त्या व्यक्तीने चिमकुल्या बाळासह अफजलगंज पोलीस ठाणे गाठले. अफजलगंज येथे नेमणुकीस असलेले प्रियंकाचे पती के.रविंदर ती चिमुकली भुकेनं व्याकूळ असल्याचं जाणलं. तसेच या बाळाला आईच्या दुधाची गरज असल्याचंही त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे, रविंदर यांनी फोन करुन प्रसुती रजेवर असलेल्या पत्नी प्रियंकाला पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. त्यावेळी भुकेने व्याकूळ झालेल्या व रडत असलेल्या लहान अनाथ मुलीला पाहून के. प्रियंका यांनीही तिला जवळ घेत आपले दूध पाजले. त्यानंतर, रुग्णालयातही नेले. दरम्यान, महिला पोलीस प्रियंका यांच्या या दातृत्वाचे आणि खाकी वर्दीतल्या मातृत्वाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, महिला पोलीस के प्रियांका यांनी जी संवेदनशीलता दाखवली त्यासाठी हैद्राबाद पोलीस आयुक्तांनीही के.प्रियंका व तिचे पोलीस पती एम. रवींदर यांना सन्मानित केले.

 

टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेhospitalहॉस्पिटल