शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद एन्काऊंटरमधील 2 आरोपींनी यापूर्वीही केले होते 9 बलात्कार; तपासात धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:57 IST

हैदराबादमध्ये एन्काऊंटर झालेल्या 4 आरोपींपैकी दोघांवर यापूर्वी 9 महिलांसोबत बलात्कार केल्याचं उघड झालं आहे

ठळक मुद्देहैदराबाद वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करण्यापूर्वी 2 आरोपींनी केले होते 9 बलात्कार पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड घटनेच्या तपासासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या भागात रवाना

हैदराबाद - तेलंगाणा येथे 27 नोव्हेंबरला झालेल्या एका महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला होता. त्यानंतर पोलिसांच्या या कारवाईचं जनतेकडून कौतुक झालं तसेच काही जणांनी या एन्काऊंटरची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येत आहे. 

हैदराबादमध्ये एन्काऊंटर झालेल्या 4 आरोपींपैकी दोघांवर यापूर्वी 9 महिलांसोबत बलात्कार केल्याचं उघड झालं आहे असा दावा चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तपासादरम्यान या दोन्ही आरोपींनी 9 महिलांसोबत बलात्कार करुन त्यांना अशाचप्रकारे जाळून मारलं असल्याचं कबुली दिली होती. त्यानंतरच हैदराबाद पोलिसांनी या आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार मारलं. सध्या साइबराबाद पोलीस आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्नाटकात तपास करत आहे. कारण यातील काही घटना तेलंगणा, कर्नाटक सीमाभागात घडल्या आहेत. मोहम्मद आरिफ, जे नवीन, जे शिवा आणि चेन्नाकेशवुलू यांनी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जाळून ठार मारलं होतं. 

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार या आरोपींना कस्टडीमध्ये घेतल्यानंतर आम्हाला तेलंगणा आणि कर्नाटक हायवेवर महिलांसोबत बलात्कार आणि जाळून मारणे अशा 15 घटनांच्या तपासात महत्वाचे धागेदोरे हाती लागले. या 15 पैकी 9 घटनांमध्ये यातील दोघा आरोपींचा समावेश असल्याचं त्यांनी कबूल केलं होतं. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम तपासासाठी घटनास्थळी पाठविण्यात आल्या. 

तेलंगणा पोलिसांचा दावा आहे की, आरिफचा सहा गुन्ह्यामध्ये समावेश आहे तर चेन्नाकेशवुलू याचा तीन महिलांचा बलात्कार आणि हत्या प्रकरणात समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार तेलंगणासह संगा रेड्डी, रंगा रेड्डी आणि महबूबनगर हायवे, कर्नाटकातील सीमावर्ती भागातील शहरात या घटना घडल्या आहेत. 

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी मध्यरात्री एन्काऊंटर केला आहे. त्यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरातून तर सोशल मीडियावर हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं जातं होतं.  

 

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिसRapeबलात्कार