शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद निजामाचा जेवणाचा डबा, चहाचा कप चोरला; वाचा किती होता किंमती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 18:18 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही वस्तूंची किंमत करोडो रुपयांना असल्याचे समजते. या वस्तू सातवा निजाम मीर उस्मान अली खान यांना भेटीदाखल मिळाल्या होत्या. 

हैदराबाद : हैदराबादमधील जुन्या राजवाड्यामध्ये निजामाच्या वस्तूंच्या संग्रहालयातून सोन्याचा डबा आणि हिऱ्यांनी मढवलेला कप चोरी झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही वस्तूंची किंमत करोडो रुपयांना असल्याचे समजते. या वस्तू सातवा निजाम मीर उस्मान अली खान यांना भेटीदाखल मिळाल्या होत्या. 

पोलीस अधिकाऱ्यांनुसार रविवारी रात्री ही चोरी झाली. सोमवारी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत नोंद केली. या डबा 2 किलो वजनाचा आहे. यावर किंमती हिरे आणि माणिक लावलेले आहेत. याची किंमत जवळपास 50 कोटी रुपये आहे. हा डबा संग्रहालयाच्या चौथ्या मजल्यावर ठेवला होता. या संग्रहालयामध्ये 450 ऐतिहासिक वस्तू  प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये काही वस्तू सहावा निजाम मीर महबूब अली खान यांच्याही वस्तू आहेत.

चोरट्यांनी दोरीच्या सहाय्याने चौथा मजला गाठला. यानंतर झरोक्याच्या काचेच्या खिडकीतून त्यांनी आत प्रवेश केला. सोमवारी सकाळी संग्रहालयातील वस्तू गायब असल्याचे दिसले. पोलिसांनी चोरीला गेलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी 10 पथके रवाना केली आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण