तेलंगणातील रहिवासी मोहम्मद अहमद रशियाला जाऊन एका कंस्ट्रक्शन कंपनीत काम करण्याचं स्वप्न पाहत होता. हे स्वप्न घेऊन तो एप्रिलमध्ये तेलंगणातूनरशियाला आला. पण रशियात आल्यानंतर काही आठवड्यांतच तो रशिया-युक्रेन युद्धामध्ये अडकला. जॉब एजंटने त्याला फसवल्याचा गंभीर आरोप आहे. आता त्याला रशियासाठी बंदुकीचा धाक दाखवून युद्ध लढण्यास भाग पाडलं जात आहे. व्हिडीओ शेअर करून त्याने धक्कादायक प्रकार सांगितला आहे.
मोहम्मद अहमदची पत्नी अफशा बेगम, जी हैदराबादमध्ये राहते. तिने अहमदला वाचवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. तिने दावा केला की, तो रशियात अडकला आहे आणि त्याला लढण्यास भाग पाडलं जात आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात, अहमदच्या पत्नीने म्हटलं आहे की, मुंबईतील एका कन्सल्टन्सी फर्मने पतीला रशियातील एका कंस्ट्रक्शन कंपनीत नोकरी देऊ केली होती. त्यांच्या करारानुसार, अहमद एप्रिल २०२५ मध्ये भारत सोडून रशियाला गेला.
अफशा बेगमने दावा केला की, तिच्या पतीला एक महिन्यानंतर कामावरून काढून टाकण्यात आलं आणि नंतर, इतर ३० जणांसह, एका दुर्गम भागात पाठवण्यात आलं जिथे त्याला जबरदस्तीने शस्त्र चालवण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं. पत्नीने सांगितलं की, "ट्रेनिंग घेतल्यानंतर, २६ जणांना युक्रेनियन सैन्याशी लढण्यासाठी बॉर्डरजवळ नेण्यात आलं. सीमावर्ती भागात नेलं जात असताना, अहमदने रशियन सैन्याच्या वाहनातून उडी मारली, ज्यामुळे त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. त्याने लढण्यास नकार दिला. परंतु त्यांना धमकी दिली जात आहे की, ते एकतर युक्रेनियन सैन्याविरुद्ध लढतील किंवा मारले जातील."
अहमदने रशियातून एक सेल्फी व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे आणि पाठवला आहे. त्यात, त्याने म्हटलं आहे की, त्याच्यासोबत ट्रेनिंग घेतलेल्या २५ लोकांपैकी १७ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये एक भारतीय आहे. तो म्हणाला, "मी जिथे आहे तिथे बॉर्डर आहे आणि इथे युद्ध सुरू आहे. आमच्यापैकी चार भारतीयांनी (युद्धभूमीवर) जाण्यास नकार दिला. त्यांनी आम्हाला धमकी दिली."
"माझ्यावर आणि दुसऱ्या एका व्यक्तीवर शस्त्रे रोखली. त्यांनी माझ्यावर बंदूक रोखली आणि सांगितलं की, ते मला गोळी मारतील. माझ्या पायाला प्लास्टर झालं आहे आणि मी चालू शकत नाही. ज्या एजंटने मला येथे पाठवलं त्याला प्लीझ सोडू नका. त्याने मला या सगळ्यात अडकवलं. त्याने मला २५ दिवस काम न करता येथे बसवले. मी काम मागत राहिलो, पण सर्व व्यर्थ. रशियामध्ये नोकरीच्या नावाखाली मला जबरदस्तीने युद्धात ढकलण्यात आलं."
Web Summary : An Indian man, promised a construction job in Russia, alleges he was tricked and forced to fight in the Russia-Ukraine war. He pleads for help, citing threats and casualties among fellow recruits. His wife seeks government intervention for his rescue.
Web Summary : रूस में निर्माण कार्य का वादा किए गए एक भारतीय व्यक्ति ने आरोप लगाया कि उसे धोखा दिया गया और रूस-यूक्रेन युद्ध में लड़ने के लिए मजबूर किया गया। उसने मदद की गुहार लगाई, खतरों और साथी रंगरूटों के बीच हताहतों का हवाला दिया। उसकी पत्नी ने उसकी जान बचाने के लिए सरकार से हस्तक्षेप की मांग की।