शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Hyderabad Gangrape Case: हैदराबाद गँगरेप प्रकरण; MIM आमदाराचा मुलगा आणि पुतण्यासह 6 आरोपी अटकेत, घटनेत सरकारी गाडीचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 12:36 IST

Hyderabad Gangrape Case: 28 मे रोजी एका 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता, त्याप्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आले आहे.

हैदराबाद: हैदराबादमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी AIMIM च्या आमदाराच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात पार्टीनंतर घरी परतणाऱ्या 17 वर्षीय तरुणीवर 28 मे रोजी सहा तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता. यामध्ये आरोपी मुलांचे राजकीय घराण्याशी संबंध असल्यामुळे हे प्रकरण हैद्राबादसह देशभरात चर्चेत आले आहे. सहा आरोपींपैकी एक प्रौढ आणि पाच अल्पवयीन आहेत.

सरकारी गाडीतून झाले अपहरणआरोपींमध्ये आमदाराच्या मुलासह त्याचा पुतण्याही आहे. ज्या इनोव्हा कारमध्ये हा गुन्हा घडला, ती सरकारी कार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितले की, ही कार एका आरोपीच्या वडिलांना देण्यात आली होती. आरोपीचे वडील मोठे नेते असून ते एका प्रमुख सरकारी संस्थेचे प्रमुखही आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून त्यापैकी पाच अल्पवयीन आहेत. 

या आरोपांखाली अटकेतपोलिस आयुक्त आनंद यांनी सांगितले की, आमदाराच्या मुलाला सामूहिक बलात्कारासाठी ताब्यात घेण्यात आलेले नाही, तर भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याच्या कलम 354 नुसार ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित पाच आरोपींवर कलम 376 (डी) (सामूहिक बलात्कार), 354, 366 (अपहरण), पॉक्सो कायदा, आयटी कायदा (पीडितेचे व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी) आणि इतर अनेक कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.

मुलांच्या पालकांना अटक होऊ शकतेआमदाराच्या मुलाला अटक करायला इतका वेळ का लागला? या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त आनंद म्हणाले की, पोलिसांना पीडितेच्या जबाबात सर्व पुरावे मिळून पाहायचे आहेत. याशिवाय इतरही अनेक बाबींकडे लक्ष दिल्यावरच आमदार पुत्राला ताब्यात घेता आले. पोलिस सर्व अल्पवयीन मुलांच्या पालकांना अटक करण्याचा विचार करत आहेत, मात्र आधी वस्तुस्थिती तपासली जाईल, असे आयुक्त आनंद यांनी सांगितले.

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणCrime Newsगुन्हेगारीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPoliceपोलिस