शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

Hyderabad Encounter:हैदराबादेतील बलात्काऱ्यांना ठार करणारं एनकाउंटर खोटं? न्यायालयीन समितीच्या रिपोर्टमध्ये दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 20:37 IST

Hyderabad Enconter: 27 नोव्हेंबर 2019 रोजी एका 27 वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जाळून मारले होते. घटनेच्या काही दिवसानंतर आरोपींचा एनकाउंटर करण्यात आला.

हैदराबाद: हैदराबादमध्ये 2019 मध्ये बलात्काऱ्यांचे एन्काउंटर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने बनावट असल्याचे म्हटले आहे. या समितीने बलात्कार आणि खुनातील चार आरोपींच्या हत्येप्रकरणी 10 पोलिस अधिकाऱ्यांवर खुनाचा खटला चालवावा, अशी शिफारस केली आहे. आरोपींनी पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे, परंतु समितीने या दाव्याचे खंडन केले आहे.

पोलिसांवर 302 चा खटला चालवावासर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायमूर्ती व्ही.एस. सिरपूरकर आयोगाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. आरोपींनी पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला या पोलिसांच्या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे आयोगाने म्हटले आहे. सिरपूरकर आयोगाने आपल्या अहवालात या चकमकीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. चकमकीत ठार झालेल्या चार आरोपींपैकी तीन शेख लाल मधर, मोहम्मद सिराजुद्दीन आणि कोचेरला रवी अल्पवयीन असल्याचे आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. या चकमकीप्रकरणी पोलिसांवर हत्येचा म्हणजेच 302 अंतर्गत खटला चालवावा, असे आयोगाने अहवालात लिहिले आहे.

विशेष म्हणजे, आजच सर्वोच्च न्यायालयाने हैदराबाद चकमक प्रकरणातील न्यायालयीन चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले होते. ही रिपोर्ट सार्वजनिक न करण्याची तेलंगणा सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आणि हे प्रकरण तेलंगणा उच्च न्यायालयात परत पाठवले. तपास अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांसोबत शेअर करावी, असे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी सांगितले. सर्व रेकॉर्ड हायकोर्टात पाठवावे आणि हायकोर्टाने अहवाल पाहावा. ही सार्वजनिक चौकशी आहे. अहवालातील मजकूर उघड करणे आवश्यक आहे. अहवाल आल्यावर त्याचा खुलासा झाला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. 

काय आहे प्रकरण?27 नोव्हेंबर 2019 रोजी एका महिला पशुवैद्यकाचे अपहरण करून चार आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर आरोपींनी महिलेला जाळून मारले होते. या घटनेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. आरोपींना ठार करण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली. या घटनेच्या काही दिवसातच चकमकीत चार आरोपींना गोळ्या घालून ठार करण्यात आले. 

 

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस