शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे... ऑपरेशननंतर 3 महिने महिलेच्या पोटातच होती कात्री! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 13:57 IST

शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर एका महिलेच्या पोटातच कात्री विसरल्याची घटना समोर आली आहे. हैदराबादमधील निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील हा संतापजनक प्रकार आहे.

ठळक मुद्देऑपरेशननंतर डॉक्टरांकडून महिलेच्या पोटात राहिली कात्री नोव्हेंबर 2017 मध्ये महिलेचे हर्नियाचे झाले होते ऑपरेशननंतर ऑपरेशननंतर महिलेला सुरू झाला तीव्र पोटदुखीचा त्रास, एक्स-रे रिपोर्टमध्ये पोटात कात्री असल्याचे उघडमहिलेच्या पतीनं डॉक्टरांविरोधात पोलिसात केली तक्रार

हैदराबाद - शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर एका महिलेच्या पोटातच कात्री विसरल्याची घटना समोर आली आहे. हैदराबादमधील निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील हा संतापजनक प्रकार आहे. हर्नियाची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने 33 वर्षीय महिलेला उपचारांसाठी तिच्या कुटुंबीयांनी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महिलेच्या पोटाचा एक्स-रे काढल्यानंतर हैराण करणारी बाब उघडकीस आली. पोटात शस्त्रक्रियेची कात्री राहिल्याने तिला असह्य वेदना होत असल्याचे एक्स-रे रिपोर्टमधून स्पष्ट झाले. हर्नियाच्या ऑपरेशनदरम्यान या महिलेच्या पोटातच डॉक्टर शस्त्रक्रियेची कात्री विसरल्याची बाब तब्बल तीन महिन्यांनंतर समोर आली.   

याप्रकरणी तिच्या पतीनं डॉक्टर आणि त्यांच्या टीमविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याव्यतिरिक्त हॉस्पिटल प्रशासनानंही चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे महिलेचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. ऑपरेशनच्या काही दिवसांनंतर तिला तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ लागला. एक्स-रे काढल्यानंतर तिच्या पोटात कात्री आढळल्यानंतर तिच्या कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. तिच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलबाहेर निदर्शनं करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, महिलेला आता आणखी एका ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

 

हा प्रकार दुर्दैवी - हॉस्पिटल प्रशासन ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया हॉस्पिटलचे संचालक के. मनोहर यांनी दिली आहे. दरम्यान, पोटात कात्री राहिल्यानं महिलेच्या आतील अवयवांना संसर्ग झालाय का?, याची तपासणीही डॉक्टरांचं एक पथक करत आहे. ऑपरेशननंतर 12 नोव्हेंबर 2018ला महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. पोट दुखू लागल्याने तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यादरम्यान, करण्यात आलेल्या वैद्यकिय तपासणीनंतर तिच्या पोटात कात्री असल्याचे निष्पन्न झाले. सध्या हॉस्पिटलमधील त्रिसदस्यीय समिती या घटनेची चौकशी करत आहेत 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय